निरोगी जीवन

मूगाच्या चविष्ट रेसिपीजनी जीभेचे पुरवा चोचले आणि वजन करा कमी

Leenal Gawade  |  Sep 17, 2021
मूग रेसिपीज

 मूग हे असे कडधान्य आहे जे प्रत्येक घरात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. मुगाची भाजी करण्याची सर्वसाधारण पद्धत ही एकसारखीच असते. मूगाची तशी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मूगाच्या काही वेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करु शकता. मूग हे खायलाच हवेत कारण मूगामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक घटके असतात. जसे की, व्हिटॅमिन A, B असते. इतकेच नाही तर त्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस असतात. कफ, पित्तासाठी मूग हे फायद्याचे असते. इतकेच नाही तर मूगामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. त्यामुळे डाएटमध्ये अगदी हमखास मूगाचा समावेश केला जातो. मूगाच्या जीभेचे चोचले पुरवणाऱ्या आणि वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या रेसिपीज नक्की ट्राय करा 

मटकीपासून बनवा चटकदार रेसिपी आणि वजन करा कमी

मूग चटपटा

Instagram

संध्याकाळच्या भूकेच्या वेळी काहीतरी चटपटीत असे खाण्याची इच्छा अनेकदा होते. तुम्हालाही असे होत असेल पण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही थोडेसे स्वत:ला आवरत असाल तर तुम्ही घरीच मूगाचे चाट म्हणजेच मूग चटपटा करु शकता. ज्यामुळे तुमच्या जीभेचे चोचले पुरवण्यास नक्कीच मदत होईल

साहित्य:  उकडलेले मूग, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो, आमचूर पावडर, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव 

कृती: उकडलेले मूग घेऊन ते तव्यावर थोडे रोस्ट करुन घ्या.त्यामुळे त्यांची चव अधिक वाढते. त्यामध्ये तेव्हाच चाट मसाला घाला. त्यामुळे ते अधिक चविष्ट लागतात. 

आता एका बाऊलमध्ये उकडून तव्यावर रोस्ट केलेले मूग घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि आमचूर पावडर घाला.

घरी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मेथीचे लाडू


वरुन डाळिंबाचे दाणे घाणून त्यावर शेव भुरभुरा. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घाला. म्हणजे तुम्हाला ती तिखटही लागेल.

मूगाचे डोसे

Instagram

रोजच्या डोशांचा प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही एक दिवस मूूगाचे डोसे बनवून खाऊ शकता. मूगाचे डोसे करुनही खाऊ शकता. चवीला मूगाचे डोसे फारच चविष्ट लागतात. त्यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास असे डोसे बनवायला हवे 

कच्चे मूग खाण्याने मिळतो शरीराला फायदा, जाणून घ्या

साहित्य- हिरव्या सालीच्या मूगाची डाळ किंवा भिजवलेले मूग, लसणीच्या पाकळ्या, मीठ, सर्व्ह करण्यासाठी चटणी 

कृती:  मूगाची डाळ किंवा मूग साधारण चार तास तरी भिजवा. त्यानंतर एका मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये मूगाची डाळ/ मूग घालून त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या आणि मीठ घाला. बॅटर चांगले डोशा बॅटरसारखे वाटून घ्या. आता एक पॅन घेऊन त्यामध्ये डोसे बनवायला घ्या. कमीत कमी तेलामध्ये हे डोशे तयार होतात. तुम्ही याचे कुरकुरीत डोसेही बनवू शकता. 

आता मूगाच्या या रेसिपीज तुम्ही अगदी हमखास ट्राय करा. 

Read More From निरोगी जीवन