लाल सिंह चड्ढा या आमिर खानच्या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तीन वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू असल्यामुळे चाहते या ट्रेलरची आतूरतेने वाट पाहत होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यास खूप वेळ लागला आहे. त्यातच आता ट्रेलर पाहिल्यावर सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढू लागली आहे. काही लोकांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला आहे तर काहींनी मात्र या चित्रपटावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या कारण
का होतोय आमिर खान ट्रोल
आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. फॉरेस्ट गंपमध्ये टॉम हॅंक्सने मुख्य भूमिका साकारली होती. आमिरने या चित्रपटात हॉलीवूड हिरोला कॉपी केल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. या शिवाय आमिरने काही वर्षापूर्वी म्हटलं होतं की, ” भारत देश असहिष्णू झाला आहे आणि तो त्याच्या पत्नीसोबत भारत सोडून जाण्याचा विचार करत आहे” आता हे सर्व जुने वाद सोशल मीडियावर पुन्हा एकदा उफाळून वर आले आहेत. ज्यामुळे आमिरला देशाचा अपमान, नेपोटिझम अशा अनेक गोष्टींसाठी ट्रोल केलं जात आहे. आमिरच्या लाल सिंह चड्ढाचं ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर #BoycottLaalSinghChaddha चा ट्रेंड सुरू झाला आहे. नेटकऱ्यांनी लाल सिंह चड्ढावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीला आता चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या दी कश्मीर फाईल्सवरपण आमिरने प्रतिक्रिया दिली होती की, “प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा”. या प्रतिक्रियेमुळेही आमिर आता ट्रोल होत आहे. विशेष म्हणजे आमिरसोबत करिना कपूरही सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. कारण तिने देखील नेपोटिझमवर केलेलं एक वक्तव्य आता ट्रोलिंगसाठी कारणीभूत ठरत आहे.
तुम्ही पाहिला का लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर
असं असलं तरी काही लोकांना मात्र लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर खूपच भावुक करत आहे. ज्यामध्ये लाल सिंह चड्ढाच्या बालपणीची झलक दिसत आहे. यात लाल सिंह चड्ढाची भूमिका आमिर खानने केली आहे, तर त्याच्या आईची भूमिका मोना सिंहने केली आहे. आमिर खान आणि करिना कपूरची लव्ह केमिस्ट्री यात दिसणार आहे. या चित्रपटातून साऊथ स्टार नागा चैतन्य बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित केला जाईल. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच चाहते आमिरवर खूश आहेत की नाराज ते कळणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje