मराठी प्रेक्षकांसाठी मराठी मालिका म्हणजे जीव आहेत. त्यातही सध्या सर्वात जास्त गाजलेली मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. किरण गायकवाडने ही भूमिका अप्रतिम वठवली आणि या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. खलनायकाची भूमिका असूनही किरण गायकवाडला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र ही मालिका संपल्यानंतर आता किरण गायकवाडने आपल्या सोशल मीडियावरून अत्यंक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना सांगितल्या आहेत. किरणने ही भूमिका नक्कीच जगली आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे इतक्या दिवसांची मेहनत अखेर फळाला आली आहे. किरणने आपल्या टीमसह प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानले आहेत.
अधिक वाचा – वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी …
किरणची भावूक पोस्ट
किरणने काही तासांपूर्वीच ही पोस्ट शेअर केली असून त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. किरण म्हणाला की, ‘मी खूप दिवस झाले हा विचार करतोय कि post लिहावी पण शब्द नव्हते … आज लिहूनच टाकलं. देवमाणूस सीरियल बघता बघता संपली …..
खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडुन काम करत असतात माझे सहकलाकार , सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादां पर्यंत साऱ्यांनी हातभार लावला ….देवमाणुसच्या सेटवरचा प्रत्येक माणूस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही ; कारण रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणाऱ्या आजवरच्या मालिकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणूसने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे नी मोठे रात्री जागून न चुकता देवमाणूस बघू लागले
“या डॉक्टर ला लई हानला पाहेन “
“हयों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो “
“हा डॉक्टर ह्यच्यातर @&₹£^%# (अपशब्द)“
“खुप सारे meme तयार झाले memers ला पण सलाम यार “
आणि मी म्हणतो हीच खरी माझ्या कमाची पावती
अधिक वाचा – स्वीटू आणि ओमच्या लग्नात मालविका आणणार व्यत्यय
किरणने अगदी स्पॉटदादापासून सर्वांचेच आभार मानले आहेत आणि पुढे म्हटले की, ‘हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती..पण जशी कागदावर गोष्ट आणण पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातून दूर झाल्या. पद्मा मॅडम @padmashinde व मालिकेचे लेखक स्वप्निल सर @swapnilvilas आणि विशाल कदमने @vishal_writer कागदावर ही पात्रं जिवंत केली …. सलाम तुमच्या लेखणीला आणि असे अनेक पात्र तुमच्या लेखणीतून जन्म घेत राहो 🎤 @santoshbansode135 🎥 @patekar55 आमच्या सारख्या मातीला हो मातीलाच आकार द्यायचा होता आणि त्यासाठी दिग्दर्शक राजू सावंत @rajusawant_ या शिवाय दुसरं नाव असूच शकत नाही. अनेक यशस्वी मालिका दिल्यानंतरही राजू सरांचा उत्साह
आणि तळमळ पहिल्या कामाइतकीच असते आणि ही देवमाणूसच्या सेटवरच्या प्रत्येकाने अनुभवली. राजू सावंत, अमित सावरडेकर @aamti_s आणि सरांची सेना आमची डिरेक्शन टीम लव यु @joshiganesh23 @_pradipnsh_ @onkar.7070. खूप सारे प्रेक्षक असतील ज्यांना माझं काम नाही आवडलं तुम्हाला पण thank यू … मी अजून प्रयत्न करत राहिन. ठरवलं होतं फार बोलायच नाही पण खूप व्यक्त झालो .. फार वेळ घेत नाही … लवकरच काहीतरी भन्नाट घेऊन येईनच … जबाबदारी वाढलिए. माझ्यावर विश्वास ठेऊन याआधी भैयासाहेब मग डॉक्टर असे दोन पात्र करायला वज्र प्रोडक्शन @vajraprod आणि झी मराठी @zeemarathiofficial ने मला संधी दिली त्याबदल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻 ….. मी आशा करतो मी तुमच्या विश्वासास पात्र ठरलो आसेन @shwetashinde_official @padmashinde @sojalsawant @devmanus_official. लोभ असावा
यानंतर किरण नक्की कोणता नवा प्रोजेक्ट करणार आहे याबाबत त्याने माहिती दिली नसली तरीही आपण काहीतरी भन्नाट नक्कीच करू असं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही त्याचे नवे प्रोजेक्ट कोणते असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. लवकरच किरणला पुन्हा एकदा पाहता येईल अशी अपेक्षा चाहते करत आहेत.
अधिक वाचा – विकी कौशल आणि कतरिना कैफने केला का साखरपुडा, काय आहे सत्य
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade