धनश्री काडगावकर नंदिता वहिनी या नावाने घराघरात पोहचली. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील तिचा ठसका आणि नकारात्मक छटेमुळे तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला. मात्र मालिका रंजक वळणावर असतानाच अचानक तिला मालिकेतून काढता पाय घ्यावा लागला होता. याचं कारण होतं तिची वैयक्तिक जबाबदारी… जानेवारी महिन्यात ती आई झाली. त्यामुळे गरोदरपण, बाळंतपण आणि पालकत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तिने करिअरमधूव काही काळ ब्रेक घेतला होता. आता धनश्री एका मोठ्या गॅपनंतर पुन्हा मालिकेतून पुनरागमन करत आहे.घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
वैभव तत्त्ववादीचा ‘ग्रे’ रहस्यमयी आणि थरारक अनुभव देणारा चित्रपट
काय आहे घेतला वसा टाकू नकोचं कथानक
आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि ज्यामुळे हा कार्यक्रम फारच लवकर लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्रीने या आधी नकारात्मक भूमिकेमधून प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Bigg Boss Marathi : ही जोडी तुटायची नाय…. विशाल-विकासची मैत्री सगळ्यांना आवडणारी
नव्या भूमिकेबाबत धनश्री उत्सूक
धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, “माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल कि नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्कं करून हि भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade