बॉलीवूड

ऑडिशन न देताच तापसी पन्नूने मिळवला होता तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट

Trupti Paradkar  |  May 23, 2021
ऑडिशन न देताच तापसी पन्नूने मिळवला होता तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलीवूडमध्ये आता चांगलाच जम बसवला आहे. वास्तविक तापसीने 2010 मध्ये राघवेंद्र राव द्वारा दिग्दर्शित तेलुगू चित्रपट ‘झुम्माण्डि’ मधून अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र तिला बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला ‘चश्मे बहाद्दर’ या चित्रपटातून… एवढंच नाही बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिला या चित्रपटात कोणत्याही ऑडिशनशिवायच एन्ट्री मिळाली होती. याबाबत स्वतः तापसीने सविस्तर खुलासा केला आहे की तिला आजही ऑडिशनची किती भीती वाटते. 

अशी मिळाली तापसीला बॉलीवूडमध्ये एन्ट्री

तापसीने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. तिच्या मते, तिने चित्रपटात काम करण्यासाठी कोणता अभिनयासाठी केला जाणारा कोर्स अथवा प्रशिक्षण घेतलं नव्हतं. तिने अभिनयाचे धडे थेट चित्रपटाच्या सेटवरच घेतले आहेत. लोकांना ती प्रिती झिंटाप्रमाणे दिसते असं वाटत होतं. कदाचित यामुळे तिला बॉलीवूडमध्ये सहज ब्रेक मिळाला. एवढंच नाही तर ती  देवाचे आभार मानते कारण तिचा पहिला डेब्यू चित्रपट चश्मबहाद्दुरसाठी तिला ऑडिशनदेखील द्यावी लागली नाही. तापसीला आजही वाटतं की जर तिने चुकून या चित्रपटासाठी ऑडिशन दिली असती तर ती नक्कीच रिजेक्ट झाली असती. चष्मेबहाद्दरमध्ये तापसी पन्नूसोबत अली जफर, दिव्येंद्रु शर्मा, सिद्धार्थ नारायण, ऋषी कपूर आणि अनुपम खेर होते. डेविड धवनने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. एवढ्या दिग्गजांसमोर पहिल्यांदा अभिनय करण्यात तापसीला यश आलं आणि तिचा बॉलीवूडमधल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. 

ऑडिशनबाबत काय आहे तापसीचा अनुभव

तापसीच्या मते तिने आजवर अतिशय खराब ऑडिशन दिलेले आहेत. आयुष्याच्या प्रत्येक ऑडिशनमध्ये तिला आजवर अपयश आलं होतं. तिच्या मते मी कॅमरा आणि लाईटसमोर ऑडिशन देऊच शकत नसे. जर तिला पहिल्या चित्रपटासाठी या सर्व प्रकारातून जावं लागलं असतं तर ती कदाचित आज अभिनेत्री होऊ शकली नसती. एवढंच काय सुरूवातीला तर ती जाहीरातींच्या ऑडिशनमध्येही अययस्वी होत असे. ज्यामुळे तिला कोणतंही काम मिळत नव्हतं. आजही या गोष्टीचा विचार करून तापसी हैराण होते की ती तेव्हा नेमकं काय चुकीचं करत होती. तिला नेहमीच ऑडिशनची भीती वाटत असे. आजवर ती अनेक ऑडिशनमध्ये अपयशी झाली आहे. तिला घरातील मंडळी आणि सहकलाकार समजावत असत की तूच काय मोठ मोठे सुपरस्टार्स आजही ऑडिशन देतात मग तुला काय प्रॉब्लेम आहे? पण तापसीला आजही ऑडिशनची  तितकीच भीती वाटते. इतरांना वाटत असे की तापसीमध्ये अॅटीट्यूड आहे म्हणून तिला ऑडिशन द्यायची नाही. मात्र असं मुळीच नव्हतं. आज मात्र तापसीने ऑडिशन न देताही अनेक चित्रपटांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. लवकरच ती शाबास मिठू या चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं असून त्याचे फोटो तापसी नेहमी तिच्या इंन्स्टा अकाऊंटवर शेअर करत असते. ज्यामुळे चाहत्यांमध्ये आता तापसीच्या या आगामी चित्रपटाची चांगलीच उत्सुकता वाढली आहे.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं ‘लॉकडाऊन लग्न’, सोशल मीडियावर चर्चा

घरी बसून कंटाळला असाल तर कुटुंबासोबत पाहा या सीरिज

या कारणामुळे अमिषा पटेल झाली इंडस्ट्रीमधून बाहेर

Read More From बॉलीवूड