आरोग्य

ऍसिड रिफ्लक्स व हार्ट बर्न यात काय फरक आहे, जाणून घ्या 

Vaidehi Raje  |  Jun 9, 2022
heartburn vs acid reflux

अनेक वेळा खाण्यापिण्यात काही बदल झाल्याने किंवा गडबड झाल्याने आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ, आम्लपित्त आणि अस्वस्थता हा त्रास होतो. या त्रासाला सामान्य माणसाच्या भाषेत त्याला छातीत जळजळणे किंवा ऍसिड रिफ्लक्स म्हणतात. परंतु प्रत्यक्षात छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. जाणून घ्या या दोन त्रासांमधील मुख्य फरक- 

छातीत जळजळ होणे आणि ऍसिड रिफ्लक्स होणे म्हणजे काय 

ऍसिड रिफ्लक्स होतो जेव्हा पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत जाते आणि तेथील ऊतींना त्रास होतो तेव्हा उद्भवते. तर छातीत जळजळ हे ऍसिड रिफ्लक्सचे लक्षण आहे. याला हार्ट बर्न असेही म्हणतात कारण अन्ननलिका हृदयाच्या अगदी मागे असते आणि इथेच जळजळ जाणवते. साधारणपणे, लोक छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्स या दोन्हींना एकच त्रास समजतात. पण हे चुकीचे आहे. या दोन्हींत काही फरक आहे. उदाहरणार्थ, छातीत जळजळ हे ऍसिड रिफ्लक्सचे लक्षण आहे. हार्टबर्न झाल्यामुळे छातीत जळजळ, वेदना किंवा अस्वस्थता येऊ शकते आणि त्या व्यक्तीला खूप अस्वस्थ वाटू शकते.जेव्हा ऍसिड रिफ्लक्स होते तेव्हा छातीत जळजळ तर होतेच पण त्याशिवाय इतर लक्षणेही दिसतात.

घसा किंवा तोंडात आम्ल पुन्हा येणे, तोंडाला कडू चव येणे,  घसा खवखवणे, पोट खराब होणे (अपचन होणे) ,  पोटदुखी किंवा अस्वस्थता,  मळमळणे,  पोट आणि वरच्या ओटीपोटात सूज येणे, कोरडा खोकला येणे, घशात घट्टपणा जाणवते आणि गिळताना त्रास होणे किंवा घशात अन्न अडकले आहे अशी भावना होणे ही ऍसिड रिफ्लक्सची काही लक्षणे आहे. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे की ऍसिड रिफ्लक्स (GERD) चा त्रास असेल तर खाल्ल्यानंतर किंवा झोपल्यावर छातीत जळजळ होऊ शकते व त्यामुळे छातीत दुखू शकते. पण जर खूप दिवसांपासून छातीत वेदना होत असतील तर एकदा डॉक्टरांना नक्की भेटा कारण छातीत दुखणे हे हृदयविकाराचा झटका किंवा इतर कोणत्याही गंभीर हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

Heartburn Vs Acid Reflux

हार्ट बर्न आणि ऍसिड रिफ्लक्स कशामुळे होते? 

ऍसिड रिफ्लक्स आणि हार्ट बर्न होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदा. दारू पिणे , धुम्रपान, लठ्ठपणा , खराब पोश्चर (स्लाउचिंग) , काही औषधे घेणे, फॅटी आणि तळलेले पदार्थ खाणे, लसूण आणि कांदे अति प्रमाणात खाणे, कॅफिनयुक्त पेये, आम्लयुक्त पदार्थ जसे की लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटो, मसालेदार पदार्थ, एकाच वेळेला खूप जास्त प्रमाणात खाणे, खूप पटापट खाणे, झोपायच्या आधी खाणे,  गर्भधारणा, मधुमेह,  पोटातील आम्ल वाढणे , तणाव, झोलिंगर-एलिसन सिंड्रोम, पोटात गाठ होणे ,वजन वाढणे या कारणांमुळे ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. छातीत जळजळ आणि ऍसिड रिफ्लक्सची अनेक कारणे असली तरी, अन्न हे या समस्येचे मुख्य कारण आहे. एवढेच नाही तर असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, ज्यामुळे तुमची समस्या वाढू शकते. तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ, चॉकलेट, कॅफिनयुक्त पेये, आम्लयुक्त खाद्यपदार्थ , मसालेदार पदार्थ खाल्ल्याने हा त्रास होण्याची शक्यता वाढते. 

Heartburn Vs Acid Reflux

छातीत जळजळ किंवा ऍसिड रिफ्लक्सवर उपचार 

बहुतेक केसेसमध्ये आहार आणि जीवनशैलीतील बदल ऍसिड रिफ्लक्स (GERD) आणि हार्ट बर्नच्या लक्षणांपासून आराम देण्यास मदत करू शकतात. काही प्रकरणांमध्ये ओव्हर-द-काउंटर किंवा प्रिस्क्रिप्शन औषधे घेणे आवश्यक असते. क्वचित प्रसंगी, ऍसिड रिफ्लक्स बरा करण्याचा शेवटचा उपाय म्हणजे फंडोप्लिकेशन नावाची शस्त्रक्रिया होय. या शस्त्रक्रियेदरम्यान, सर्जन पोटाचा काही भाग अन्ननलिकेभोवती कॉलरसारखा गुंडाळतो, ज्यामुळे ऍसिड पुन्हा अन्ननलिकेत जाण्यापासून प्रतिबंध होतो. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य