सुगंधी राहणे कोणाला आवडत नाही. एखादी व्यक्ती आपल्या आजुबाजूने जाताना तिचा घामाचा दुर्गंध न येता ज्यावेळी मन प्रसन्न करणारा एक गंध येतो. त्यावेळी आपले नाक आपोआपच तेथे जाते. बाजारात इतक्या प्रकारची सुगंधी द्रव्य मिळतात ज्यांचा वापर कशासाठी केला जातो हे आपल्याला माहीत नसेल. सेंट किंवा परफ्युम वगळता बाजारात बॉडी मिस्ट असाही एक प्रकार मिळतो असे देखील अनेकांना माहीत नसेल. जर तुम्ही कधी परफ्युमऐवजी बॉडी मिस्ट वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला या दोघांमधील फरक माहीत असणे गरजेचे आहे. हा फरक कळला की. तुम्हाला नेमकं काय घ्यायला हवं ते देखील कळेल.चला करुया सुरुवात
अंडरआर्म्समधील सुरकुत्या अशा करता येतील कमी
बॉडी मिस्ट
पाण्यासारखा असलेला हा प्रकार हल्ली अनेक ठिकाणी मिळू लागला आहे. तुम्हाला सुगंधी करणे हे याचे उद्दिष्ट असले तरी याच्या नावाप्रमाणे यामध्ये काही विशेष घटक आहेत.
- बॉडी मिस्ट वॉटर बेस्ड असते यामध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असते
- बॉडी मिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे सेंट मिळतात. पण हे सेंट फार लाईट असतात ते इतके स्ट्राँग नसतात.
- बॉडी मिस्ट हे फार स्वस्त असते. ते पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे तुमच्या खिशाला फार खड्डा पडत नाही.
- बॉडी मिस्टचा सुंगध हा मंद असल्यामुळे त्याचा गंध जास्त काळासाठी टिकून राहत नाही.
- बॉडी मिस्टमध्ये जास्त पाणी असते. त्यामुळे त्याचा गंध जास्त टिकत नाही.
- बॉडी मिस्ट हे फार ऑईली नसते.इसेन्शिअल ऑईलमधील घटक यामध्ये फारच कमी असल्यामुळे हा सेंट फार काळ टिकत नाही.
स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी
बॉडी परफ्युम
अनेकांना सुंगधी राहायला आवडते म्हणून ते त्यांच्यासोबदत परफ्युम घेऊन फिरतात. बॉडी मिस्ट की परफ्युम यापैकी काय निवडायचे हे कळत नसेल तर तुम्ही बॉडी परफ्युममधील घटक जाणून घ्या.
- परफ्युममध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा सेंट अधिक काळासाठी टिकून राहतो.
- परफ्युममध्ये स्ट्राँग लाईट असे वेगवेगळे प्रकार मिळतात. पण ते स्ट्राँग असतात आणि ते जास्त काळासाठी टिकतात.
- परफ्युम हे महाग असतात. तुम्हाला वेगवेगळ्या रेंजमध्ये ते मिळतात. अनेक मोठ्या ब्रँडचे परफ्युम हे खूप महाग असतात.
- परफ्युममध्ये अनेक घटक असल्यामुळे हे परफ्युम जास्त काळासाठी टिकून राहतात. तुम्हाला त्याचा सतत वापर करावा लागत नाही.
- परफ्युममध्ये इसेन्शिअल ऑईल असते. ज्यामुळे हे जास्त काळासाठी टिकून राहते. त्याचा जास्त वापर केला तर त्याचा त्रास होतो.
- बॉडी परफ्युम तुम्ही थेट अंगावर वापरु शकत नाही. कारण तो पोअर्सच्या आत जाऊन त्याचा त्रास त्वचेला होऊ शकतो.
आता जर तुम्ही नेमकं काय घ्यायंचं आणि सुंगधी राहण्यासाठी काय वापरायचे असा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच हा फरक जाणून घ्यायला हवा.
DIY : फक्त तीन गोष्टींपासून असा तयार करा होममेड हेअर स्प्रे
Read More From Bath and Body Products
त्वचेचे सौंदर्य खुलवेल सी सॉल्ट स्क्रब (Sea Salt Scrub For Skin In Marathi)
Leenal Gawade
निसर्गाच्या खजिन्यांपासून साधलेलं ‘प्रकृती सूत्र’
Aaditi Datar
आंघोळ करताना या गोष्टींचा वापर कराल तर त्वचेच्या विकारांपासून होईल सुटका
Leenal Gawade