बॉलीवूड
‘ब्रम्हास्त्र’मध्ये झळकणार का मुन्ना भय्या, चित्रपटातील भूमिकेबाबत काय म्हणाला दिव्येंदु शर्मा
आलिया भट आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र सध्या अनेक गोष्टींसाठी चर्चेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि यात काम करणाऱ्या कलाकारांविषयी दररोज काही ना काही तरी अपडेट समोर येत असतं. आता तर या चित्रपटात मिर्झापुर फेम मुन्ना भय्या म्हणजेच दिव्येंदु शर्मादेखील असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण ब्रम्हास्त्रच्या विकीपीडिया पेजवर स्टार कास्ट सेक्शनमध्ये दिव्येंदु शर्माचं नाव बराच काळ दिसत होतं. त्यामुळे दिव्येंदु या चित्रपटात असणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र याबाबत दिव्येंदुला काहीच माहीत नसलेल्याचं दिसून आलं. जाणून घ्या काय आहे हे सर्व प्रकरण
‘ब्रम्हास्त्र’च्या पेजवर का आहे दिव्येंदुचं नाव
स्टार कास्ट लिस्टमध्ये दिव्येंदुचं नाव झळकलं असलं तरी स्वतः दिव्येंदुने याबाबत त्याला काहीच माहीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच्या मते त्याने ”ब्रम्हास्त्रमध्ये कोणतीच भूमिका केलेली नाही. पण जर स्टार कास्ट लिस्टमध्ये त्याचं नाव असेल तर कदाचित पुढील भागात म्हणजेच ब्रम्हास्त्रच्या सीक्वलमध्ये तो असू शकतो. रणबीर आणि आलियाच्या ब्रम्हास्त्रची प्रेक्षकांना आतुरता लागलेली असताना त्याच्या सीक्वलची बातमी आधी समोर आल्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे. या चर्चेला सुरूवात झाल्यावर पेजवरून दिव्येंदुचं नाव काढून टाकण्यात आलं तरी त्याबाबत असलेली चर्चा अजून थांबलेली नाही.
कसा असणार ब्रम्हास्त्र
ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याचे प्रोमो व्हिडिओज व्हायरल होताना दिसत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र तीन भागात तयार केला जाणार आहे. कारण या चित्रपटाचे कथानक खूप मोठे आणि रंजक असणार आहे. सहाजिकच या चित्रपटाची स्टार कास्टही तितकीच मोठी असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून सध्या तरी त्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय, शाहरूख खान. डिंपल कपाडिया असणार यावर शिक्का मोर्तब झालेलं आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje