Eye Make Up

DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स

Trupti Paradkar  |  Sep 24, 2020
DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स

मेकअपचे ट्रेंड सतत बदलत असतात. बदलत्या ट्रेंडनुसार मेकअप करायचा म्हणजे काळानुसार नवनवीन गोष्टी ट्राय करायला हव्या. सध्याचा ट्रेंड हा कलर आय लायनरचा आहे. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांसाठी फ्रेश, वायब्रंट आणि ब्राईट कलर काजळ, आयलायनर हवं असेल तर तुम्ही ते घरीच तयार करू शकता.आपल्या मेकअप किटमध्ये असे अनेक प्रॉडक्ट असतात ज्याचा वापर अनेक प्रकारे करू शकतो. यासाठी जाणून घ्या तुमच्या फेव्हरेट आयशॅडोपासून स्वतःच कलर आयलायनर कसं तयार करावं.

Instagram

कलर आय लायनर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य –

घरच्या घरी कलर आयलायनर तयार करण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची मुळीच गरज नाही. 

आयलायनर तयार करण्यासाठी वापरा हे साहित्य –

Shutterstock

आय लायनर तयार करण्याची पद्धत

आय लायनर बनवण्यासाठी या सोप्या टिप्स अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो करा

स्टेप 1 – हात सॅनिटाईझरने स्वच्छ करा आणि तुमची आवडती आय शॅडो अथवा लूज पिंगमेंट घ्या. कोणतेही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट अवश्य तपासा. कारण तुम्ही ते डोळ्यांसाठी वापरणार आहात. जर तुम्हाला शिमर लुक हवा असेल तर शिमरी अथवा सॅटिन शेडची आय शॅडो घ्या. तुम्ही यासाठी एखाद्या पावडर ब्लशचाही वापर करू शकता. 

स्टेप 2 – कॉटन बड्सच्या मदतीने एका रिकाम्या डबीत तुम्हाला हवं तितकं आय शॅडो अथवा ब्लश काढा. रिकामी डबी स्वच्छ  आणि सॅनिटाईझ केलेली असेल याची काळजी घ्या.

स्टेप 3 – डबीतील आय शॅडोमध्ये काही थेंब पाणी मिसळा. ज्यामुळे ते लिक्विड फॉर्ममध्ये येईल. जर तुम्हाला यासाठी गुलाबपाणी अथवा रिफ्रेशिंग आय ड्रॉप्स वापरायचे असतील तर तुम्ही ते ही वापरू शकता. 

स्टेप 4 – आय लायनर ब्रशने हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. ज्यामुळे ते लिक्विड फॉर्ममध्ये येईल. जर ते घट्ट असेल तर त्यात थोडं आणखी पाणी अथवा आय डॉप्स मिसळा. जर ते खूपच पातळ झालं असेल तर त्यात थोडी आय शॅडो पुन्हा मिक्स करा. असं करत करत तुम्हाला हवी तशी कन्सिस्टंसी मिळवा. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची योग्य काळजी घ्या.

स्टेप 5  – या मिश्रणात आय प्रायमर अथवा फेस मिसळा आणि मिश्रण ढवळून घ्या. ही स्टेप तुम्हाला नको असेल तर तुम्ही वगळू शकता. मात्र असं केल्यामुळे तुमचं आय लायनर जास्त काळ डोळ्यांवर टिकेल 

स्टेप 6 – एक ते दोन मिनिट सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि डबी बंद करून ठेवून द्या. तुम्ही तयार केलेलं हे आय लायनर खूप दिवस टिकू शकतं. शिवाय ते लवकर कोरडे देखील होणार नाही. 


अशा पद्धतीने आय लायनर करायला आल्यावर तुम्हाला महागडे आय लायनर खरेदी करण्याची मुळीच गरज लागणार नाही. सध्या कोरोनाच्या काळात मेकअप वरचा खर्च वाचवण्यासाठी ही एक बेस्ट युक्ती आहे. जर तुम्हाला ही युक्ती आवडली असेल तर ती आमच्यासोबत जरूर शेअर करा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

मस्कारा लावताना होतोय त्रास, तर खास सोप्या हॅक्स

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी यामी गौतमचा फंडा

घरच्या घरी बनवा हेअर जेल,जाणून घ्या कसं

Read More From Eye Make Up