त्वचेची काळजी

गव्हाच्या कोंड्यापासून बनवा फेस आणि बॉडी स्क्रब, त्वचा होईल चमकदार

Trupti Paradkar  |  Jan 24, 2021
गव्हाच्या कोंड्यापासून बनवा फेस आणि बॉडी स्क्रब, त्वचा होईल चमकदार

सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही आजवर अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरले असतील. मात्र तुम्हाला हवा तसा परिणाम मिळाला असेलच असं नाही. खरंतर महागड्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा घरातील काही टाकाऊ पण नैसर्गिक वस्तू जास्त फायदेशीर ठरू शकता. शिवाय हे उपाय करताना कोणतेही दुष्परिणाम आणि कसलाही खर्च होत नाही. पोळ्या करताना गव्हाचे पीठ चाळल्यावर निघणारा कोंडा आपण नेहमी  फेकून देतो. गावाकडची मंडळी हा कोंडा गाईला चारा म्हणून देतात. मात्र शहरामध्ये ही गोष्ट टाकाऊच समजली जाते. मात्र हा  कोंडा  तुमच्यासाठी बेस्ट स्क्रब ठरू शकतो.

कोंडा म्हणजे गहू दळल्यावर गव्हाचे निघणारे आवरण… हा कोंडा तुमच्या सौंदर्यासाठी वरदान ठरू शकतो. कोरड्या, निस्तेज, सनटॅन झालेल्या त्वचेवर या कोंड्याचा अफलातून परिणाम होतो. त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि त्वचा नितळ होण्यासाठी तुम्ही  हा उपाय एकदा तरी करून पाहायला हवा.

Shutterstock

गव्हाच्या कोंड्याचे त्वचेवर होणारे अफलातून फायदे –

गव्हाच्या कोंड्याचे त्वचेवर फारच चांगले परिणाम होतात. ज्यामुळे त्वचेवर या कोंड्याचा फेस स्क्रब अथवा बॉडी स्क्रबप्रमाणे वापर करणं नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.

वाचा – DIY Masoor Dal Face Packs In Marathi

Instagram

गव्हाच्या कोंड्यापासून कसा तयार कराल स्क्रब –

गव्हापासून तयार केलेला हा स्क्रब तुम्ही चेहरा आणि संपू्र्ण शरीरावरील त्वचेवर वापरू शकता. 

साहित्य –

कसा कराल वापर –

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करून खुलवा तुमचे सौंदर्य

गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार

अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत

Read More From त्वचेची काळजी