भविष्य

रस्त्यावर पडलेले पैसे उचलू नका, नाहीतर तुम्हाला भोगावे लागतील परिणाम

Dipali Naphade  |  Apr 8, 2020
रस्त्यावर पडलेले पैसे उचलू नका, नाहीतर तुम्हाला भोगावे लागतील परिणाम

रस्त्यावर पैसे मिळाले आहेत असं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडलंच असणार.  अशी एकही व्यक्ती नसेल ज्याच्याबरोबर असा किस्सा घडला नसेल. मिळालेले पैसे आपण गरीबाला तरी देतो अन्यथा देवळात पैशाच्या पेटीत जमा करतो. खूपच कमी लोक असतात जे अशा प्रकारे मिळालेला पैसाही स्वतःच्या खिशात घालतात. पण तुम्ही त्यापैकी एक असाल तर वेळीच सावध व्हा. जमिनीवर पडलेले पैसे हे कधीही आपल्याजवळ ठेऊ नयेत. कारण ते नक्की कोणाचे आहेत आणि समोरची व्यक्ती ज्याचे पैसे हरवले आहेत ते नक्की कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याची आपल्याला कोणालाचा माहिती नसते. जर तुम्हाला पाकिटासह मिळाले तर शक्यतो त्या व्यक्तीला ते परत करावे. पण काहीच इलाज नसेल तर तुम्ही ते देवळात दान करावे अन्यथा एखाद्या गरीबाला द्यावे. पण स्वतःकडे ठेऊ नयेत. याची नक्की कारणं काय आहेत हेच आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

सध्या गरज आहे ती म्युच्युअल फंडाची…महिलांनीही गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे

रस्त्यावर मिळाले पैसे तर स्वतःजवळ ठेऊ नका

Shutterstock

याला बऱ्याच अंशी अध्यात्मिक कारण देण्यात येते. ज्या व्यक्तीचे पैसे जमिनीवर अर्थात रस्त्यावर पडले आहेत. त्या व्यक्तीची ऊर्जा त्या पैशांमार्फत आपल्याजवळ येते. ही ऊर्जा सकारात्मक अथवा नकारात्मक कोणतीही असू शकते. कारण समोरची व्यक्ती आनंदी आहे की दुःखी आहे आपल्याला कोणालाच माहीत नसतं. जर समोरची व्यक्ती आनंदी असेल तर त्याची ऊर्जा नक्कीच सकारात्मक असेल पण समोरची व्यक्ती दुःखी असेल अथवा त्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू असेल तर नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहचू शकते. त्यामुळे रस्त्यावर पडलेले पैसे उचलू नका आणि जरी उचलले तरीही ते तुमच्याजवळ न ठेवणंच चांगलं. कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहचून तुम्हाला त्याचं नुकसान अधिक भोगावं लागतं. तुमचाही वाईट काळ सुरू होतो असं म्हटलं जातं. याला कोणताही वैज्ञानिक पाठिंबा नसला तरीही आध्यात्मिक अभ्यासात हेच कारण देण्यात येतं. ऊर्जेची देवाणघेवाण तशीच सुरू राहून अधिकाधिक लोकांना त्याचा त्रास संभवू शकतो असे म्हटले जाते.  

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

नाणे मिळाले तर शुभ

Shutterstock

तुम्हाला जर रस्त्यावर एखादे नाणे मिळाले तर ते शुभसंकेत असल्याचे मानण्यात येते. तुमचे आयुष्य एका नव्या वाटचालीकडे सुरू होणार असल्याचे संकेत तुम्हाला मिळतात असं मानण्यात येते. तुम्ही जर एखाद्या गोष्टीची चांगली सुरूवात करणार असाल आणि त्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर हा तुमच्यासाठी सर्वात चांगला काळ आहे असंही समजण्यात येतं. रस्त्यावर नाणे मिळणं याचा संबंध हा नेहमी तुमच्या आयुष्यात घडणारी प्रगती आणि यश यासह जोडण्यात येतो.  पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते नाणे तुमच्याजवळ ठेवावे. हा केवळ शुभसंकेत समजण्यात येतो. तुम्ही नाणे मिळाले तरीही त्याचा उपयोग स्वतःसाठी न करता देवळात अथवा गरिबांना देण्यासाठीच करावा. 

तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे

नोट मिळाल्यास ठरते अशुभ

एका बाजूला जर नाणे मिळाले तर शुभसंकेत समजण्यात येतो तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर एखादी नोट मिळाली तर ती पुढच्या वेळेविषयी तुम्हाला सूचित करण्याचे काम करते असे समजण्यात येते. जर तुम्हाला रस्त्यावर एखादी नोट मिळाली तर आपल्या सद्यस्थितीविषयी तुम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असाही इशारा असतो असे म्हटले जाते. तुम्ही तुमच्या कामामध्ये टाळाटाळ करत असून तुम्हाला असेच चालू राहिले तर अधिक नुकसान होऊ शकेल याचा हा संकेत असतो. त्यामुळे एखादी नोट तुम्हाला रस्त्यावर मिळाली तर तुम्ही त्याकडे आनंदी होऊन न पाहता त्याचा योग्य विचार करणे आवश्यक आहे. काही गोष्टींचे संकेत असतात आणि त्याप्रमाणे वागणं योग्य असतं असं म्हटलं जातं.  त्यापैकीच हा एक अशुभ संकेत असल्याचेही समजण्यात येते. 

सूचना – या लेखातून  कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. मात्र अध्यात्मिक अभ्यासात देण्यात आल्यानुसार याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत याची नोंद घ्यावी. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From भविष्य