नातीगोती

एखादा पाळीव प्राणी पाळताना…

Leenal Gawade  |  May 6, 2022
पाळीव प्राणी पाळताना

आपल्या घरात पाळीव प्राणी असावा अशी खूप जणांची इच्छा असते. एखादे मांजर, कुत्रा आपल्याकडे असावा असे खूप जणांना वाटते. पण घरी असलेल्या पाळीव प्राण्याला काही झाले की, संपूर्ण घराचे स्वास्थ बिघडते. तुम्ही घरात कुत्रा, मांजर किंवा घरात कोणताही पाळीव प्राणी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टीची खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे असते. पाळीव प्राणी आणणं ही एका दिवसाची गोष्ट नाही. त्यासाठी सातत्य आणि वेळ दोन्ही असणे गरजेचे असते. एखादा पाळीव प्राणी पाळताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत असायला हव्यात ते आता आपण जाणून घेऊया.

पाळीव प्राणी घेताना

पाळीव प्राणी पाळताना

तुम्ही कोणता पाळीव प्राणी घेणार आहात? त्यासाठी लागणारे हवामान आणि जागा या सगळ्याची तजवीज करणे गरजेचे असते.  तुम्ही कोणता प्राणी घेताय म्हणजे कुत्रा, मांजर त्यांना घरात कसेही ठेवून चालत नाही. त्यांना योग्य जागा करावी लागते. त्यामुळे तुमच्याकडे अशी जागा आहे का? हे पाहून घ्या. जर तुमच्याकडे अशी जागा असेल. पाळीव प्राण्याची अबाळ होणार नसेल तरच तुम्ही पाळीव प्राणी घेण्याचा विचार करा. 

उदा. काही पाळीव प्राणी खूप मोठे असतात. त्यांना जागाही खूप लागते.अशी जागा तुमच्याकडे नसेल तर तुमच्या प्राण्याप्रती असलेले प्रेम कामाचे नाही. कारण तुम्ही जर कुठेही ॲडजस्ट करु शकत असलात तरी तुम्हाला प्राण्यांच्या बाबतीत असे करता येत नाही.

 अबाळ करु नका

काही जणांचे प्राणी प्रेम हे क्षणिक असते. म्हणजे त्यांना काही काळासाठी प्राणी जवळ असावा असे वाटते. पण ज्यावेळी आपल्याला कुठे बाहेर जायचे  किंवा काही इतर काम असतात. त्यावेळी खूप जण आपल्या जबाबदाऱ्या झटकतात. एखादा जीव वाढवायचा म्हणजे त्याच्यासाठी आपला सगळा वेळ देणे गरजेचे असते. जर तुमच्याकडे असा वेळ नसेल तर तुम्ही अजिबात पाळीव प्राणी पाळू नका. कारण पाळीव प्राण्याचा तुमच्यावर जीव राहतो. जर तुम्ही त्याला वेळ देऊ शकत नसाल तर तुम्ही तो प्राणी अजिबात पाळू नका. 

उदा. खूप जण प्राणी केवळ घरात असावा म्हणून आणतात. पण ज्यावेळी त्याला गरज असते त्यावेळी तुम्ही जर सोडून जाणार असाल तर त्याचा काही फायदा नाही. कारण त्यामुळे पाळीव प्राणी दुखावले जातात.

खर्च झेपणारा आहे का

पाळीव प्राणी  पाळायचा म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. कारण त्यालाही अनेक खर्च आणि मेन्टेन्स आले. त्यांचे स्पेशल डॉक्टर आणि खाणे हे वेगळे असते ते तुम्ही त्यांना द्यायला हवे. दिसायला केवळ चांगले आहेत म्हणून तुम्ही त्यांना घरी आणून चालत नाही.  कारण काही प्राणी हे जितके महाग असतात. तितका त्यांचा खर्चही असतो. हा खर्च तुम्हाला झेपणारा असेल तरच तुम्ही पाळीव प्राणी घेण्याचा विचार करा. पाळीव प्राण्याचे खाणे- पिणे, औषधे, त्याला लागणारे वातावरण हे आपल्याला माहीत असेल तरच त्यांना घरी आणा. 

आता पाळीव प्राणी आणताना तुम्ही या काही गोष्टींचा नक्की विचार करा. 

Read More From नातीगोती