आपल्याकडे अजूनही कंडोमचा वापर आणि कंडोमबाबत स्पष्ट बोललं जात नाही. पण गरोदर होण्यापासून आणि STD पासून वाचण्यासाठी कंडोमचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच जणांना याचीही माहिती नसते की कंडोमची एक्स्पायरी डेट असते की नाही. याबाबत आपण जाणून घेणार आहोत. तारीख न बघता कंडोम वापरणं सुरक्षित आहे का? कंडोम खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. हल्ली मुलीदेखील बिनधास्त जाऊन कंडोमची खरेदी करतात. त्यामुळे मुलींनादेखील याबाबत माहीत असणं आवश्यक आहे. कंडोम हे सुरक्षेसाठी वापरण्यात येतं. त्यामुळे कंडोमची खरेदी करण्यात कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. कंडोमविषयी पूर्ण माहिती प्रत्येकाला असायलाच हवी.
भांडण झाल्यावर सेक्स करण्यात येते अधिक मजा, जाणून घ्या ट्रिक्स
हो, कंडोमची एक्स्पायरी डेट असते
Shutterstock
अन्य औषधांप्रमाणे कंडोमचीही एक्स्पायरी डेट असते. जेव्हा कंडोमची खरेदी केली जाते तेव्हा त्याच्या पाकिटावर त्याची एक्स्पायरी डेट अर्थात तारीख लिहिलेली असते. त्याआधी याचा वापर करावा. कंडोम त्या आधी न वापरल्यास, ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्या पाकिटावर जी तारीख दिली गेली आहे, त्या कालावधीतच त्याचा वापर करावा. साधारणतः एका कंडोमची एक्स्पायरी डेट कालावधी हा एक वर्षांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे तुम्ही किमान एक वर्ष हे वापरू शकता. पण तरीही कंडोम जास्त ठेऊन वापरू नये. काळजी घ्यावी.
फ्रिक्शनमुळे खराब होण्याचा धोका
कंडोम जर तुम्ही पर्स, पाकिट अथवा वॉलेटमध्ये ठेऊन दिलं तर सतत फ्रिक्शन होऊन खराब होण्याची शक्यता असते. तसंच उष्णता आणि गरमीमुळे त्याच्या दर्जावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ठिकाणी हे कंडोम ठेवण्याची गरज आहे. कपाटामध्ये अथवा एखाद्या कपड्याच्या आत तुम्ही हे व्यवस्थित ठेऊ शकता.
सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्ननांना…कसं ते जाणून घ्या
नैसर्गिक मटेरियलचे कंडोम लवकर खराब होतात
Shutterstock
नैसर्गिक मटेरियलचा वापर करून बनविण्यात आलेले कंडोम हे लवकर एक्स्पायर होतात. त्यांचा कालावधी काही काळाचाच असतो. काही सिंथेटिक मटेरियलने बनवलेले कंडोम्स हे जास्त प्रमाणात टिकतात. त्यामुळे तुम्हाला जर काही महिन्यांसाठी कंडोम घरात ठेवायचे असेल तर तुम्ही कंडोम नक्की कोणते आहे ते बघून घ्या. साधारणतः हे सिंथेटिक कंडोम्स पाच वर्ष टिकतात. तुम्हाला सतत जाऊन कंडोम खरेदी करायला जमणार नसेल तर तुम्ही अशा तऱ्हेचे कंडोम खरेदी करू शकता. मात्र तरीही त्याची नक्की एक्स्पायरी डेट काय आहे ते बघून घ्या.
स्पर्मीसाईड केमिकल्स असणारे कमी काळ टिकतात
ज्या कंडोममध्ये स्पर्मीसाईड केमिकल्सचा वापर करण्यात आला असतो ते कमी काळ टिकतात. कधीही कंडोम खरेदी करत असताना घाईगडबडीने खरेदी करू नये. त्याची व्यवस्थित एक्स्पायरी डेट आणि कोणत्या मटेरियलपासून ते बनले आहे ते पाहून घ्या. तरच तुम्हाला त्याचा व्यवस्थित आनंद घेता येईल. कंडोमची एक्स्पायरी डेट संपली असेल तर त्याचा वापर करू नका. असं केल्यास त्याचा तुम्हालाच त्रास होईल. कारण डेट निघून गेल्यानंतर त्याचे मटेरियल अत्यंत कमजोर होते आणि त्यामुळे सेक्स करताना कंडोम फाटण्याची भीती असते. त्यामुळे सहसा एक्स्पायरी डेटनंतर तुम्ही त्याचा वापर न केलेलाच बरा.
भांडण मिटवण्यासाठी उत्तम उपाय आहे मेक-अप सेक्स
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा