Uncategorized

डोक्यात फोड येणे उपाय | Dokyat Fod Yene Upay

Dipali Naphade  |  May 24, 2022
dokyat-fod-yene-upay-in-marathi

उन्हाळ्याचे दिवस आल्यावर अनेकांना डोक्यात फोड येण्याची समस्या निर्माण होताना दिसून येते. तसंच आजकाल धावपळीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळेही डोक्यातल्या त्वचेची नीट काळजी घेतली जात नाही आणि मग डोक्यात फोड येणे (Dokyat Fod Yene), डोक्यात पुरळ येणे (Dokyat Pural Yene) अथवा केसात फोड येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यावर अर्थात डोक्यात फोड येणे उपाय (Dokyat Phod Hone Upay) आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डोक्यात फोड येणे उपाय जाणून घेण्यापूर्वी डोक्यात फोड का येतात हे जाणून घेण्याची अधिक आवश्यकता आहे. 

डोक्यात फोड का येतात – Dokyat Fod Ka Yetat?

डोक्यात फोड का येतात

आपल्याकडे शरीराप्रमाणेच केसांची आणि डोक्याच्या त्वचेची काळजी कमी घेतली जाते. प्रदूषण, धूळ या सगळ्या गोष्टींमुळे केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवरही परिणाम होत असतो. यामुळे डोक्यात फोड येणे (Dokyat Fod Yene), त्वचा लालसर होणे, डोक्यात खाज होणे, डोक्यात गाठ होऊन ती फुटणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. डोक्यात फोड येण्याची काही महत्त्वाची कारणे आपण आधी पाहूया – 

डोक्यात फोड येण्यामागची कारणे – Dokyat Fod Yenyamagchi Karne Marathi

डोक्यात फोड येण्याचे प्रकार – Dokyat Fod Yenyache Prakar

डोक्यात फोड येण्याचे प्रकार 

डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे फोड येतात. डोक्यात फोड येणे म्हणजे नक्की काय आणि कोणत्या प्रकारचे ते फोड असतात आणि याला नक्की काय म्हटले जाते ते आपण पाहूया. 

घामुळं – उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत लहान लहान पुरळ येतात त्याला घामुळं असं म्हटलं जातं. यामुळे डोक्यात सतत खाज येत राहते आणि त्वचेची जळजळदेखील होते. लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो 

गळू – बरेचदा डोक्यात फोड येऊन त्याचा आकार वाढतो. त्यात पू होतो त्याला गळू असं म्हटलं जातं. गळू बहुदा त्वचेमध्ये निर्माण होते आणि सूक्ष्म जीवाणूमुळे हे गळू तयार होते. यामुळे प्रचंड त्रास होतो. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींना हा त्रास सहन करावा लागतो 

चिखल्या – साधारणपणे शेतात काम करणाऱ्यांना डोक्यात चिखल्या तयार होतात. पावसाळ्यामध्ये चिखल्या डोक्यात निर्माण होतात 

डोक्यात फोड येणे घरगुती उपाय – Dokyat Phod Hone Upay

डोक्यात फोड येणे ही अत्यंत सामाईक समस्या आहे. त्यासाठी तुम्ही घरगुती उपायही करू शकता. पण हे उपाय करताना नक्की कशा पद्धतीने यावर उपाय करायला हवेत याची योग्य पद्धत – 

हळद वापरा – डोक्यात फोड येण्यावर उपाय

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून हळद वापरा (Turmeric Use for Dokyat Phod Hone)

(Turmeric Use for Dokyat Phod Hone) हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. जर तुमच्या डोक्यात फोड येऊन जखमा होत असतील तर तुम्ही नक्की हळदीचा वापर करायला हवा. घरगुती वापरामध्ये अनेक जखमांवर हळदीचा वापर केला जातो. तसाच तुम्ही डोक्यात फोड आल्यासही हळदीचा वापर करू शकता 

खोबरेल तेलाचा वापर – डोक्यात फोड येणे यावर उत्तम उपाय

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून खोबरेल तेलाचा वापर (Coconut Oil For Dokyat Phod Hone)

(Coconut Oil For Dokyat Phod Hone) उन्हाळा असो वा हिवाळा यामध्ये डोक्याची त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यात हा त्रास जास्त जाणवतो. डोक्यात कोरडेपणा आल्यामुळे खाज येणे आणि फोड येणे अशा समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करणे अधिक चांगले ठरते. 

कडुलिंबाची पाने – डोक्यात फोड झाल्यास घरगुती उपाय

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून कडुलिंबाची पाने (Neem Leaf For Dokyat Phod Hone)

(Neem Leaf For Dokyat Phod Hone) कडुनिंबाची आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्वचेच्या रोगाशी संबंधित बहुतेक वेळा कडुनिंबाची पाने कोमट पाण्यात घालून आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात येतो. तसंच डोक्यात इन्फेक्शन झाले असेल अथवा फोड आले असतील तर तुम्ही कडुनिंबाचा लेप नक्की वापरावा

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून अँटिबॅक्टेरियल साबण

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून अँटिबॅक्टेरियल साबण (Antibacterial Soap For Dokyat Phod Hone)

(Antibacterial Soap For Dokyat Phod Hone) डोक्यात फोड येणे अशी समस्या तुम्हालाही असेल तर तुम्ही अँटिबॅक्टेरियल साबण वापरून पाहू शकता. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. फक्त तुम्ही अँटिबॅक्टेरियल साबण वापरणार असाल तर स्वतःच्या मनाने तुम्ही वापरू नका. तुम्ही तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांकडूनच याची माहिती घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार हा साबण वापरा. या साबणाच्या वापरामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ राहण्यास मदत मिळते. यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 

कापूर – डोक्यात फोड होणे यावर रामबाण उपाय

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून कापूर (Use Camphor For Dokyat Phod Yene)

(Use Camphor For Dokyat Phod Yene) साधारण लहान वयात बऱ्याच मुलींना उवा आणि लिखांचा त्रास होतो. उवांच्या त्रासामुळे डोक्यात खाज येते आणि त्यामुळे फोडही डोक्यात येतात. यासाठी तुम्ही कापूरचा वापर करून बघा. कापूर आणि खोबरेल तेलाच्या वापरामुळे उवा आणि लिखा नष्ट होण्यास मदत मिळते. 

टी ट्री ऑईलचा वापर – डोक्यात फोड झालेला असल्यास त्यावर उपचार

डोक्यात फोड येणे उपाय म्हणून टी ट्री ऑईलचा वापर (Tea Tree Oil For Dokyat Phod Hone)

(Tea Tree Oil For Dokyat Phod Hone) टी ट्री ऑईल हे एक नैसर्गिक तेल आहे. केसांमध्ये कोरडेपणा आल्यामुळे डोक्यात फोड येतात. त्यामुळे सतत केसात खाज येत राहते. मात्र यावर टी ट्री ऑईल हा उत्तम उपाय आहे. 

कोरफड वापरून डोक्या झालेला फोडवर उपचार करा

कोरफड (Aloe Vera For Dokyat Phod Hone)

(Aloe Vera For Dokyat Phod Hone) कोरफड हे त्वचेसाठी अत्यंत चांगले ठरते. ही आयुर्वेदिक वनस्पती असून पूर्वीच्या काळापासून याचा चांगला उपयोग आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि अगदी केसांसाठीही करण्यात येतो. तुमच्या डोक्यात खाज येणे, कोंडा होणे आणि डोक्यात फोड येणे अशा समस्या असतील तर तुम्ही कोरफडची ताजी जेल लावल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळतो. तसंच तुमची त्वचा अधिक मुलायम होण्यास आणि केसातील कोंडा निघून जाण्यासही मदत मिळते. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ताज्या कोरफड जेलचा वापर करावा. 

डोक्यात फोड आल्यास कोणते तेल लावावे 

डोक्यात फोड आल्यास कोणते तेल लावावे 

डोक्यात फोड आल्यास, तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता हे आम्ही तुम्हाला वर सांगितलं आहे. त्याशिवाय अजून कोणते तेल वापरता येईल ते तुम्ही जाणून घ्या – 

खोबरेल तेलाप्रमाणेच तुम्ही या वरील तेलांचा वापर करून डोक्याला फोड आल्यावर मसाज केल्यास, तुमच्या डोक्याची त्वचा कोरडी राहात नाही आणि डोक्यात फोड येण्याची समस्येपासूनही तुम्हाला सुटका मिळते. हे सर्व तेल नैसर्गिक असून तुम्हाला याचा कोणताही दुष्परिणाम केसांवर दिसून येत नाही. मात्र तरीही तुम्हाला यापैकी कोणत्याही तेलाची अलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारूनच यापैकी कोणत्याही तेलाचा वापर आपल्या केसांतील आलेल्या फोडावर करावा. 

केसांमध्ये फोड आल्यास फॉलो करा या सोप्या टिप्स

केसांमध्ये फोड आल्यास फॉलो करा या सोप्या टिप्स

केसांमध्ये अर्थात डोक्यात फोड आल्यास तुम्हाला काही काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही सोप्या टिप्सचा वापर करावा

प्रश्नोत्तरे (FAQ) – डोक्यात फोड येणे उपाय | Dokyat Fod Yene Upay

प्रश्नः फंगल इन्फेक्शनमुळे डोक्यात फोड येतात का?
उत्तरः केसांच्या मुळांना सूज येण्याची आणि खाज येण्याची समस्या ही फंगल इन्फेक्शनमुळेच होते. त्यामुळे सतत डोक्यात खाज येत राहून खाजवत राहिल्यास, फोडाची समस्या निर्माण होते. 

प्रश्नः डोक्यात फोड आल्यास, वॉर्म कम्प्रेस उपयोगी पडतो का?
उत्तरः डोक्यात फोड आला असेल तर तुम्ही वॉर्म कम्प्रेसचा नक्कीच वापर करू शकता. यासाठी तुम्ही मऊसूत कापड गरम पाण्यात भिजवा आणि फोड आलेल्या ठिकाणी काही वेळ ठेवा. हा प्रयोग दिवसातून तुम्ही 5-6 वेळा केल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल

प्रश्नः डोक्यावर फोड आल्यास, तुम्हाला कोणतेही तेल वापरून चालते का?
उत्तरः डोक्यावर आलेले फोड घालविण्यासाठी तुम्ही लवंग, दालचिनी, टी ट्री ऑईल, खोबरेल तेल असे कोणतेही नैसर्गिक उपयुक्त तेल वापरू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहचणार नाही. 

निष्कर्ष – केसात फोड येणे, डोक्यात पुरळ येणे (Dokyat Pural Yene) अथवा डोक्यात फोड येणे उपाय (Dokyat Phod Hone Upay) तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. 

Read More From Uncategorized