Dating

काहीही झाले तरी जोडीदारासोबत कधीही शेअर करु नका काही सिक्रेट्स

Leenal Gawade  |  Jan 31, 2020
काहीही झाले तरी जोडीदारासोबत कधीही शेअर करु नका काही सिक्रेट्स

‘कुछ राझ अगर राझ ही रहे तो अच्छे होते है’ हे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. तुम्ही काही गोष्टी तुमच्यापर्यंत स्तिमित ठेवल्या तर आयुष्यात तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.बरेचदा आपण जोडीदारासोबत अशा काही गोष्टी शेअर करतो की, त्यामुळे नात्यात दुरावा यायला लागतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत काहीही शेअर करताना विशेष काळजी घ्यायला हवी. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही काही गोष्टी शेअर न केलेल्याच बऱ्या असतात. जाणून घेऊया तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नेमकं काय शेअर करायला नको ते…

तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी

shutterstock

प्रत्येकाचा काहीना काही भूतकाळ असतो. या भूतकाळातील प्रत्येकाचे अनुभव चांगले असतातच असे नाही. तुमचाही भूतकाळ वाईट असेल. त्याचा तुमच्या आताच्या आयुष्याशी काहीही संबंध नसेल तर त्या  गोष्टी तुम्ही न सांगितलेल्या बऱ्या. पण याचा असा अर्थ नाही की, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खोटं बोला. तुम्हाला तुमचा भूतकाळ काही ठराविक पद्धतीने सांगता आले पाहिजे. कारण भूतकाळातील काही गोष्टी तुमच्या नव्या जोडीदाराच्या मनात संशय निर्माण करु शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी फार सांगण्याचा प्रयत्न करु नका. त्यापेक्षा मागे केलेल्या चुका भविष्यात जोडीदारासोबत करणार नाही याकडे अधिक लक्ष द्या.

रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या

तुमचे सोशल मीडिया पासवर्ड

प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. नात्यामध्ये कधीही दुरावा येऊ शकतो. अनेकदा तुम्ही काही जोडप्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने व्यक्त होताना पाहिले असेल. जर तुम्ही तुमचे सोशल मीडिया पासवर्ड जोडीदाराला देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही असे अजिबात करु नका. कारण तुमच्या काही गोष्टी खासगी असणे फार गरजेचे असते. हल्लीच्या काळात सोशल मीडिया असे माध्यम आहे ज्यामुळे नाहक बदनामी आणि चुकीच्या गोष्टी पोस्ट करणे होत असते. तुम्हाला तुमच्या जोडीदारावर कितीही विश्वास असला तरी तुम्ही तुमचे पासवर्ड शेअर करु नका.  कधी कधी हे पासवर्ड शेअर करणे अधिक धोक्याचे असते. कारण तुमच्या जोडीदाराच्या मनात नाहक संशयाला जागा निर्माण करण्याची क्षमता यामध्ये असते. 

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

तुमच्या घरातील खासगी भांडणं

प्रत्येकाच्या घरात काहीना काही वाद असतात. पण तुमच्या कुटुंबापुरत्या असलेल्या गोष्टी तुम्ही कुटुंबापुरत्याच ठेवायला हव्यात. याचे कारण असे की, काही गोष्टी चार भिंतीच्या आत असायला हव्यात. कारण या भांडणाचा परिणाम जोडीदारावर होऊ शकतो. अनेकदा प्रॉपर्टी किंवा इतरही वाद कुटुंबात असतात त्या सगळ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगणे गरजेचे नसते. 

पैशांचे व्यवहार

shutterstock

पैसा ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमचे नाते चांगलेही राहते आणि वाईटही होते. तुमच्या पैशांचे सगळे व्यवहार तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगायला नको. विशेषत: कुटुंबाचे पैशांचे व्यवहार तुम्ही कोणालाही सांगू नये. तुमच्या प्रॉपर्टीमधील गुंतवणूक किंवा तुम्ही कुठे किती पैसे गुंतवले आहे ते आधीच पहिल्या झटक्यात सांगू नका. कारण पैशावरुन अनेकदा नाती खराब होताना तुम्ही पाहिली असतील त्यामुळे तुम्ही पैशांचे व्यवहार सांगू नका.

मित्रांच्या आयुष्यातील खासगी गोष्टी

shutterstock

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मित्र- मैत्रिणी असणं अगदी स्वाभाविक आहे. त्यांच्यासोबतचे तुमचे नाते वेगळे असते. ते नाते तुमच्या जोडीदाराला माहीत असायला हवे. पण तुमच्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्ही त्यांना सांगणे गरजेचे नसते. कारण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्या सतत सांगत असाल तर त्यांच्या मनात उगाचच तुमच्या मित्रांविषयी अढी निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या मित्र- मैत्रिणी त्यात रंगणाऱ्या गप्पा या सिक्रेट ठेवा. 

आता तुम्ही कायम लक्षात ठेवा. काही सिक्रेट सिक्रेट म्हणूनच चांगले असतात.
 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From Dating