DIY लाईफ हॅक्स

घरीच करा तुमचे महागडे कपडे ड्राय क्लीन, जाणून घ्या योग्य पद्धत

Leenal Gawade  |  Nov 8, 2020
घरीच करा तुमचे महागडे कपडे ड्राय क्लीन, जाणून घ्या योग्य पद्धत

महागडे कपडे, साड्या-शरारा किंवा एखादा महागातला कुडता एकदा वापरुन झाल्यानंतर त्याचा रंग जाऊ नये आणि तो कपडा त्याचे रंग जास्ती काळासाठी टिकून राहावे यासाठी कपडे ड्राय क्लीन करण्याचा सल्ला दिला जातो. आताच्या घडीला ड्राय क्लीन करायचे म्हणजे आपल्याला किमान 100 रुपये तरी खर्च करावाच लागतो. खूप कपडे असतील तर अशावेळी जास्तीचा फटका बसणार हे अगदी नक्की असतं. साडी किंवा मोठ्या कपड्यांचे एखाद्यावेळी चालून जाते. पण कपडे अगदी लहान आणि फार महत्वाचे नसतील पण तरीही ते जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्हाला ड्राय क्लीनसाठी पैसे घालवायला लागत असतील तर अनेकांना ड्राय क्लीन करुच नये असे वाटते. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही नवीन कपड्यांचे ड्राय क्लीन.चला करुया सुरुवात 

पांढरे कपडे धुण्याची डोकेदुखी आता विसरा फॉलो करा या टिप्स

ड्राय क्लीन म्हणजे काय?

कोणतेही पाणी न वापरता कपड्यांवj योग्य अशा केमिकल्सचा उपयोग करुन कपड्यांना स्वच्छ केले जाते. असे कपडे स्वच्छ करताना कपड्यांचा रंग टिकवणे आणि कपड्यांवर चमक राहणे हा एकमेव उद्दिष्ट असते.असे करताना कपड्यांना पुन्हा एकदा कडक इस्त्री केली जाते. त्यामुळे हे  कपडे अधिक चांगले दिसू लागतात. काही कपडे एकदा ड्राय क्लीन केल्यानंतर पुन्हा करायची गरज लागत नाही. 

कधीच वापरू नयेत न धुता नवीन कपडे, होऊ शकतं त्वचेचं नुकसान

घरच्या घरी ड्राय क्लीन करण्याची योग्य पद्धत

Instagram

घरच्या घरी ड्राय क्लीन करण्यासाठी तुम्हाला काही साहित्याची गरज लागेल. हल्ली बाजारात असे होम ड्राय क्लिनींग किट मिळतात.  पण त्यामध्ये तुम्हाला डाग काढण्याची कोणतीही सोय नसते. त्यामुळे तुम्ही सुरुवात कशी करायची ते आता जाणून घेऊया. 


आता खूप पैसे घालवायचे नसतील तर तुम्ही अगदी घरच्या घरी आणि योग्य पद्धतीने ड्राय क्लीन करु शकता. 

कपाटात कपडे कसेही कोंबण्यापेक्षा असे करा तुमचे कपाट ऑरगनाईज – How to Organize Your Closet in Marathi

Read More From DIY लाईफ हॅक्स