पाकिटात एखाद्यावेळी पैसे नसले तरी चालतील पण सोबत फोन,इअरफोन आणि त्याचा चार्जर हा अगदी काहीही करुन असायलाच हवा. हा आणि फोन चांगला राहावा म्हणून हल्ली सगळेच फोनला सिलिकॉन कव्हर लावतात. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर त्यावर हळूहळू धूळ साचायला लागते. ही धुळ इतकी वाढते की, तुमचे हेडफोन, कव्हर्स काळे पडू लागतात. धूळ साचलेल्या या अॅक्सेसरीज तुम्हाला इतरही त्रास देऊ शकतात. त्यामुळेच तुम्ही अगदी वेळच्यावेळी या अॅक्सेसरीज स्वच्छ करायला हव्यात. जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आणि बसल्याजागी तुम्हाला फोनचे कव्हर्स, हेडफोन आणि चार्जिंग कॉड कशी स्वच्छ करता येतील ते
रात्री केस धुण्याची सवय केसांच्या आरोग्यासाठी ठरु शकते घातक
सॅनिटायझर ( sanitizer)
हल्ली प्रत्येकाच्या बॅगमध्ये हमखास सॅनिटायझर असते. एका टिश्यू पेपरवर सॅनिटायझर घेऊन तुम्हाला तुमच्या या सगळ्या ॅक्सेसरीज स्वच्छ करता येतील. तुम्हाला तुमच्या टिश्यूवर मळ यातून निघालेली मळ दिसून येईल. तुम्ही तुमचे सिलिकॉन कव्हर, हेडफोन आणि चार्जिंगची कॉड साफ करु शकता. आता यासाठी तुम्हाला अगदी साध सॅनिटायझर वापरायचे आहे. त्यात काही असेल म्हणजे दाणेदार असे काही असेल तर ते वापरु नका. याचे कारण असे की, जर त्यात काही रंग असतील तर मग त्याचे डाग पडण्याची शक्यता अधिक असते.
सिलिकॉन कव्हर धुताना
shutterstock
हल्ली अनेकांकडे सिलिकॉन कव्हर असतेच. तुमचे सिलिकॉन कव्हर धुणे सोपे असते. तुम्ही एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यात डिशवॉश लिक्वीड किंवा डिटर्जंट घेऊन तुम्ही त्यात कव्हर बुडवून ठेवू शकता. आता तुम्हाला थोडा त्रास घ्यावा लागेल कारण हे कव्हर पटकन स्वच्छ होत नाही. त्यामुळे टुथब्रश घेऊन तुम्ही घासून ते साफ करु शकता. (जर तुमच्या सिलिकॉन कव्हरला कपड्याचा किंवा असा काही भाग असेल तर तुम्ही ते पाण्यात बुडवू नका. तुम्ही कॉटनवर लिक्वीड घेऊन ते कव्हरवर घासा. तुमचे फोन कव्हर स्वच्छ होईल.
तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?
मॉश्चरायझर (moisturizer)
आता तुमच्याकडे जर सॅनिटायझर नसेल पण मॉश्चरायझर असेल तरी देखील चालू शकेल. तुम्हाला टिश्यू पेपरवर मॉश्चरायझर घेऊन त्याने देखील तुमची हेडफोन कॉड, हेडफोन आणि काही अंशी तुम्हाला तुमचे कव्हर स्वच्छ करता येतील. पण जर तुम्ही मॉश्चरायझर वापरत असाल तर हेडफोन्स किंवा कॉड खराब होण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे ते लावल्यानंतर मात्र तुम्हाला तुमच्या अॅसेसरीज कोरड्या करायच्या आहेत. त्यावरील मॉश्चरायझर तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायचे आहे.
आता हेडफोन्सचा कानाकडील भाग किंवा कठीण कोपरे यांना स्वच्छ करताना तुम्ही टुथपीकचा वापर केला तरी चालेल. वरील सर्व उपाय सोपे आणि तुम्हाला अजिबात त्रास देणारे देखील नाहीत. त्यामुळे आता दर 15 दिवसांनी तरी तुम्ही अशी स्वच्छता करा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.