आरोग्य

अंड्याचा पिवळा बलक चांगला की वाईट

Leenal Gawade  |  Aug 10, 2022
अंड्याचा पांढरा बलक की पिवळा आरोग्यासाठी चांगला की वाईट

अंड खात असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण अंडप्रेमींमध्येही अनेक प्रकार असतील. काहींना अंड उकडून आवडत असतील तर काहींना अंड फ्राय म्हणजेच आम्लेट स्वरुपात आवडत असेल. कॅल्शिअम आणि विविध चांगल्या गुणांनी समृद्ध असलेले असे अंडे खाताना खूप जणांना प्रश्न पडतो तो असा की, अंड्याचा पिवळा बलक चांगला की, अंड्याचा पांढरा बलक चांगला. कारण होते असे की, अनेकांना अंड्याचा पांढरा बलक खाण्याचा सल्ला दिला जातो. तर काहींना मात्र अंड्याचा पिवळा बलक खाण्यास सांगितला जातो. अंड्याचा पिवळा बलक शिजला की, तो अगदी मऊ मऊ लागतो. अंडाकरी किंवा अंड्याच्या ग्रेव्हीसारख्या पदार्थांमध्ये अंड्याचा पिवळा बलक हा अधिक चविष्ट लागतो. अंड खाताना पिवळा बलक खाऊ की नको असे तुम्हाला वाटत असेल तर चला जाणून घेऊया या महत्वाच्या गोष्टी 

अंड्याचा पिवळा बलक म्हणजे काय?

अंड्याचा पिवळा बलक

अंड फोडल्यानंतर अंड्याचा पिवळा भाग किंवा पिवळा गोळा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अंड्याचा हा पिवळा भाग म्हणजेच अंड्याचा पिवळा बलक (Egg Yolk) होय. अंड्याचा पिवळा बलक म्हणजे जीव असे सांगितले जाते. पण त्याचे काही फायदेही आहेत असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती. 

  1. अंड्याच्या या पिवळ्या बलकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन D असते. जे शरीरासाठी खूपच चांगले असते या शिवाय अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये  वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन असते.
  2. अंड्याच्या बलकामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 
  3. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही अंड्याचा बलक खा. असे सांगितले जाते. त्यामुळे जर निरोगी आरोग्य मिळण्यास मदत मिळते. ज्यावेळी एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल अशावेळी त्यांच्या शरीरातील कमतरता भरुन काढण्यासाठी अंड खाण्याचा सल्ला दिला जातो. 

पण अंड्याचा पिवळा बलक हा अतिप्रमाणात खाणेही आरोग्यासाठी चांगले नाही. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. जे तुमच्या शरीरातील स्थुलता वाढवते. याशिवाय स्थुलता वाढली इतर अनेक त्रास होऊ शकतात. अंड्यामध्ये असलेली उष्णता ही शरीरासाठी अपायकारक असते.  त्यामुळे अंड्याचा नुसता पिवळा भाग प्रमाणात खा. 

अंड्याच्या पांढऱ्या बलकात असते तरी काय?

अंड्याचा पांढरा बलक

अंड्याचा पांढरा बलक (White Yolk)  हा अनेक जण मोठ्या प्रमाणात खातात. ते अतिशय पौष्टिक म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अंड्याच्या या पांढऱ्या बलकामध्ये नेमकं काय असतं ते जाणून घेऊया. 

  1. अंड्याचा पांढरा बलक हा प्रोटीन्सनी युक्त असा असतो. त्यामुळे अंड्याचा पांढरा बलक उकडून खावा. 
  2.  वजन कमी करायचा विचार असेल तर तुमच्या आहारात अंड्याचा पांढरा बलक असायला हवा. कारण अंड लो कॅलरी असा पदार्थ असून त्याने पोट भरुन राहते आणि शरीराला आवश्यक तेच घटक मिळतात.
  3. अंड्याचा पांढरा बलक हा कोलेस्ट्रॉल फ्री असतो त्यामुळे पुढे जाऊन रक्तदाब वाढण्याची शक्यताही कमी होते. 

अंड्याचा पांढरा बलक चवीला चांगला असला तरी देखील काहींना हा पचण्यास जड जाते. काही जण दिवसात अनेक अंड्याचे सेवन करतात. त्यामुळे त्यांना गॅसची शक्यता अधिक असते. त्यांचे पोटही खराब होते. त्यामुळे अंड्याच्या पिवळ्या आणि पांढऱ्या बलकाचे आपले असे महत्व आहे. पण कोणत्याही गोष्टी घाताना त्याचे प्रमाण हे योग्य असायला हवे. 

Read More From आरोग्य