येत्या 2025 सालापर्यंत संपूर्ण देश क्षयरोगमुक्त करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जात आहे. याकरिता 2017 ते 2025 या कालावधीकरिता विशेष योजना आखण्यात आली असून त्यानुसार पाऊल उचलले जात आहे. मात्र जननेंद्रियासंबंधीत क्षयरोगाचा मुकाबला करणे, त्याचे निदान करण्यात डॉक्टराना अनेक आव्हाने पेलावी लागत आहेत. विविध चाचण्या करून संशोधन केले असता जननेंद्रियामध्ये सुप्त अवस्थेत क्षयरोगाचे जंतू आढळून येतात. जननेंद्रियाचा क्षय (टीबी) मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्लुलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो, ज्यामुळे वंध्यत्वासारखी समस्या उद्भवू शकते. ज्या व्यक्तींमध्ये जननेंद्रियाच्या क्षयरोगाचे निदान होते ते प्रामुख्याने प्रजननाच्या वयोगटातील असतात. नक्की ही समस्या काय आहे आणि क्षयरोगामुळे प्रजनन क्षमतेते अडथळा येतो का असे अनेक प्रश्न मनात असतात. या प्रश्नांवर डॉ. रिचा जगताप, क्लिनिकल डायरेक्टर अँड कन्सल्टंट रिप्रॉडक्टीव्ह मेडिसिन, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई यांच्याकडून आम्ही अधिक जाणून घेतले आहे.
‘मदर्स डे’ (Mother’s Day) निमित्त जाणून घ्या विटामिन डी चे आईसाठी असणारे महत्त्व
जननेंद्रियाच्या क्षयरोगाची लक्षणे (TB symptoms)
Shutterstock
सामान्यत: अपंगत्वाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. म्हणूनच, जेव्हा एखाद्या महिलेने गर्भधारणेची योजना आखण्याची इच्छा केली नाही तोपर्यंत प्रजनन अवयवांवर क्षयरोगाचा प्रभाव लक्षात येत नाही. जननेंद्रियाच्या क्षयरोगाचे मुख्य आणि सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे गर्भधारणेची असमर्थता. महिलांमध्ये वजन कमी होणे, थकवा येणे आणि संध्याकाळनंतर शरीराच्या तापमानात वाढ होणे. इतर लक्षणांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, अल्प प्रमाणात होणारा रक्तस्राव आणि ओटीपोटात वेदना यांचा समावेश असतो.
लॉकडाऊनच्या काळात गर्भवती महिलांनी अशी घ्या फिटनेसची काळजी, तज्ज्ञांचा सल्ला
क्षयरोगाचा गर्भनलिकांवर होणारा परिणाम
टीबीच्या इनफेक्शनमुळे फेलोपाइन ट्युबवर दुष्परिणाम झाल्याने स्त्रीबीज फलित होऊन ट्युबमधून गर्भाशयापर्यंत पोहचत नाही.त्यामुळे त्या स्त्रीला गर्भधारणा राहण्यास अपयश येते.त्याचप्रमाणे हे टीबीचे जंतू गर्भाशयाच्या अस्तरांचे देखील नुकसान करतात.त्यामुळे फलित झालेले स्त्रीबीज गर्भाशयाच्या अस्तरावर रुजत नाही.सहाजिकच त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही.अंडाशयाला इनफेक्शन झाल्यामुळे बीजांडांची गुणवत्ता कमी होते.त्याचप्रमाणे गर्भाशयाचे मुख,योनीमार्ग व बाह्य जनेनद्रियांना संसर्ग झाल्यामुळे देखील गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.
गर्भाशयावर परिणाम – गर्भनलिकांवर झालेला जंतुसंसर्ग गर्भाशयातही पसरतो व त्याच्या पोकळीमध्ये असलेल्या स्तराला हानी पोहोचते. यामुळे कधी कधी पाळीचे त्रास संभवतात असं या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.
गर्भारपणातील लसीकरण टाळू नका, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
याची लक्षणे कोणती?
वंध्यत्व – गर्भधारणा न होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे असं म्हटलं जातं. 50-60% स्त्रिया या कारणासाठी वैद्यकीय मदत घेतात. किंबहुना दुसरे कोणतेही लक्षण नसल्यामुळे मुलासाठी जेव्हा उपचार सुरू होतात तेव्हा या रोगाचे निदान अचानक होते.
जननेंद्रियाच्या क्षय रोगाचे निदान तपासणीद्वारे क्वचितच होते. तथापि, अल्ट्रासाऊंड आणि हिस्टेरोसलॉपोग्राफी सारख्या प्रतिमेमुळे क्षयरोगाच्या निदानास महत्त्वपूर्ण बिंदू मिळतील. शिवाय, लेप्रोस्कोपी शोध आणि टिश्यू कल्चर ही क्षयरोगाचे निदान करण्यासाठी मानक पद्धती आहेत. वेळीच औषधोपचार केल्यास क्षयरोगावर मात करता येते. टिबीमुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिमाण होतो. याकरिता गर्भधारणेपूर्वी प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्ही जेव्हा बाळाचा विचार करत असाल तेव्हा या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असलायच हव्यात.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक