मनोरंजन

मराठीतील अशा प्रसिद्ध जोड्या ज्यांनी नव्या वर्षात द्यावी गुड न्यूज, चाहत्यांची इच्छा

Dipali Naphade  |  Dec 22, 2020
मराठीतील अशा प्रसिद्ध जोड्या ज्यांनी नव्या वर्षात द्यावी गुड न्यूज, चाहत्यांची इच्छा

मराठीमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना प्रेक्षक खूप मनापासून फॉलो करतात. या जोड्या आपल्या घरातीलच एक वाटतात. त्यामुळेच प्रेक्षकांना त्यांच्याविषयी जास्त प्रेम आहे. अगदी सोशल मीडियावरही या जोड्यांना खूप प्रेम देण्यात येते. अशाच काही जोड्या आहेत ज्यांना लग्न करून खूप वर्ष झाली आहेत. त्यामुळे नव्या वर्षात या जोड्यांनी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज द्यावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. आपल्या घरातीलच एक वाटल्याने मनापासून त्यांच्या घरी नवा पाहुणा यावा असंही चाहत्यांना वाटत आहे. अशाच जोड्यांविषयी जाणून घेऊया. 

प्रिया – उमेश

प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेली आणि सुंदर जोडी आहे. प्रियाने जेव्हा ‘गुड न्यूज’ नाटकाची घोषणा केली होती तेव्हाही त्यांचे चाहते खूपच आनंदी झाले होते. पण हे नाटक आहे कळल्यावर थोडासा हिरमोडही झाला होता. प्रिया आणि उमेशची जोडी खूपच जणांना आवडते. या दोघांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे कधी आता प्रिया आणि उमेश खऱ्या आयुष्यात गुड न्यूज देत आहेत याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रिया आणि उमेश नेहमीच आपल्या सोशल मीडियावर एकत्र फोटो पोस्ट करत असतात आणि आपल्या आयुष्यातील घडामोडीही सांगत असतात. त्यामुळे आता नव्या वर्षात तरी या जोडीने गुड न्यूज द्यावी असं चाहत्यांना वाटत आहे.   

अमृता – हिमांशू

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा ही जोडीदेखील चाहत्यांची आवडती जोडी आहे. हे दोघेही एकमेकांना अनेक वर्ष ओळखत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नालाही खूप वर्ष झाली आहेत. त्यामुळे नव्या वर्षात या दोघांनी गुड न्यूज द्यावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. अमृताने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं असून हिमांशूचंही नाव आहे. तसंच हे दोघेही आपल्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. या जोडीनेही लवकरच बाळाला जन्म द्यावा असं चाहत्यांना वाटत आहे. नव्या वर्षात तरी ही गुड न्यूज येणार का याच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. 

#2020 मध्ये या सेलिब्रिटीजच्या घरी आले लहान पाहुणे, पहिल्यांदाच झाले आई-वडील

श्रुती मराठे – गौरव घाटणेकर

राधा ही बावरी मालिकेतून घराघरात पोहचलेली श्रुती मराठेचा चाहतावर्ग मोठा आहे. श्रुती आणि गौरव दोघेही अभिनय क्षेत्रात असल्याने दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. श्रुती आणि गौरवच्या लग्नालाही अनेक वर्ष झाली आहेत. त्यामुळे येत्या नव्या वर्षात या दोघांनीही गुड न्यूज द्यावी असे चाहत्यांना वाटत आहे. 

2021 मध्ये ट्रेंडमध्ये असतील हे हेअरकट, नववर्षाच्या स्वागतासाठी करा ट्राय

अनुजा साठे – सौरभ गोखले

अनुजा साठे आणि सौरभ गोखले ही दोन्ही नावं मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीसाठी नवी नाहीत. अनुजाने अनेक मालिकांमधून कामं केली आहेत आणि सौरभनेही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून कामं केली आहेत. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. नव्या वर्षात या मराठमोळ्या जोडीनेही गुड न्यूज द्यावी असं त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत आहे. 

2020 मध्ये यांचे उजळून निघाले भाग्य, मिळाली अमाप प्रसिद्धी

अभिजित खांडकेकर – सुखदा खांडकेकर

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिजित खांडकेकर हा सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. गुरूनाथची व्यक्तिरेखा साकारून अभिजितने सर्व प्रेक्षकांंचे मन जिंकून घेतले. अभिजित आणि सुखदा हे दोघेही मनोरंजन क्षेत्रातच आहेत. शिवाय सुखदा उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे. या दोघांच्याही लग्नाला खूप वर्ष झाली असून आता नव्या वर्षामध्ये या जोडीने चाहत्यांना सुखद धक्का द्यावा असं वाटत आहे. अभिजित आणि सुखदा ही जोडी सर्वांनाच आवडते. त्यामुळे या जोडीनेही या नव्या वर्षात चाहत्यांची इच्छा पूर्ण करावी असे वाटत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन