मनोरंजन

साऊथ सुपर ‘भागमती’च्या हिंदीत आलेल्या ‘दुर्गामती’च्या ट्रेलरवर प्रेक्षक नाराज

Leenal Gawade  |  Nov 25, 2020
साऊथ सुपर ‘भागमती’च्या हिंदीत आलेल्या ‘दुर्गामती’च्या ट्रेलरवर प्रेक्षक नाराज

साऊथच्या अनेक दर्जेदार चित्रपटांचे आतापर्यंत हिंदीत रिमेक करण्यात आले आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे चित्रपट हिंदीत तसेच्या तसे उतरवण्यात किंवा तेवढया ताकदीचा अभिनय पडद्यावर साकारण्यात हिंदी चित्रपट निर्मात्यांना यश आले आहे. ‘अर्जुन रेड्डी, , ‘कंचना’ या हल्लीच्या काही चित्रपटाचे हिंदीत रिमेक भरपूर चालल्यानंतर आता आणखी एका साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपटाचे रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथमधील अनुष्का शेट्टीला घेऊन करण्यात आलेला ‘भागमती’ आणि हिंदीत भूमी पेडणेकरच्या रुपात येणारा ‘दुर्गामती’ हा चित्रपट येण्याआधीच नापसंतीच्या यादीत गेला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून अनेकांनी याची तुलना अनुष्का शेट्टीच्या अभिनयाशी केल्यामुळे भूमी पेडणेकरच्या अभिनयावर टीका होताना दिसत आहे.

बिपाशा बासूप्रमाणे ‘बोल्ड अॅंड ब्युटिफुल’ लुक हवा तर फॉलो करा या टिप्स

कसा आहे ट्रेलर?

दुर्गामतीचा ट्रेलरची सुरुवात एका सस्पेन्सपासून होते.हा सस्पेन्सच या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. अगदी साऊथप्रमाणे या ट्रेलरची सुरुवात नसली तरी देखील तिच एनर्जी हिंदीच्या ट्रेलरमध्येही दिसत आहे. एका गुन्हेगाराला एका बड्या असामीच्या पापांचा लेखाजोगा सगळ्यांसमोर उघडण्यासाठी चंचला ( भूमी पेडणेकर) हिला तुरुंगातून बाहेर काढण्यात येते. दुर्गामती नावाच्या बंगल्यात तिला आणले जाते. या बंगल्यात आल्यानंतर अनेक अशा घटना घडतात की, या घरात काही चांगले नाही असे सतत जाणवत राहते. अखेर या घरातील दुर्गामतीची आत्मा भूमीच्या शरीरात जाते. त्यानंतर तिचे ते लाल साडीमधील रुप आणि तिचा उद्देश्य ती सांगते. असा हा साधासोपा ट्रेलर आहे. पण याला अधिक खोल बनवण्याचे काम संगीताने केले आहे. वर वर हा ट्रेलर पाहता पुन्हा एकदा ट्रेलर पाहण्याची इच्छा नक्कीच होते. पण साऊथच्या अनुष्का शेट्टीचा अभिनय आणि भूमीचा अभिनयाची तुलना केल्यानंतर यामध्ये अनेक चुका प्रेक्षकांनी काढल्या आहेत.

या कारणामुळे आवडला नाही ट्रेलर

Instagram

अनेक साऊथ चित्रपटांचे रिमेक करताना बरेच बदल केले जातात. असे आरोप नेहमीच होतात. एखादी मूळ कलाकृती लोकांनी अपेक्षित असताना त्यामध्ये केलेले फेरबदल दिल्यामुळेच कदाचित हा ट्रेलर लोकांना आवडला नाही. भूमी पेडणेकरच्या अभिनयाबाबत सांगायचे झाले तर तिचा अभिनय यामध्ये नक्कीच उठून आलेला आहे. पण अनुष्का शेट्टीशी तुलना झाल्यामुळे ती या दुर्गामती रुपात अनेकांना आवडली नाही. भागमतीमध्ये ती ज्या पद्धतीने तिच्या सिंहासनावर बसते. तो थाट भूमीला करताना नक्कीच अडचणी आल्या आहेत. ते  सिंहासन तिच्या तुलनेत फारच मोठे दिसल्यामुळे कदाचित हा फिल लोकांना आला नसावा. राहिला प्रश्न म्युझिकचा तर ते देखील उत्तम आहे. 

सेटवर साफसफाईचे केले काम, गाण्याने केले युवराज मेढेने परीक्षकांना थक्क

डिसेंबरमध्ये होणार चित्रपट रिलीज

थिएटर सुरु झाले असले तरी अजूनही नवे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. दुर्गामती हा चित्रपटदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 11 डिसेंबर रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. दरम्यान, या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लक्ष्मी हा चित्रपट आधी रिलीज करण्यात आला आहे. 

अजूनही तुम्ही दुर्गामतीचा ट्रेलर पाहिला नसेल तर तुम्ही आताच जाऊन तो बघा.

राहुल वैद्यला मत देण्यासाठी दिशाने केले ट्विट, दिशाच्या होकाराची चाहत्यांनाही उत्सुकता

Read More From मनोरंजन