Fitness

कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत

Leenal Gawade  |  Apr 29, 2021
कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांनात घाबरवून सोडले आहे. रोज वाढणारे आकडे आणि बातम्यांमधून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी यामुळे अनेकांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ लागले आहेत. सतत मनात येणारे विचार आणि त्यामुळे  अनेकांचे आयुष्य अस्वस्थ झाले आहे. ज्येष्ठ नागरिकच नाही तर भविष्याचा कोणताच अंदाज येत नसल्यामुळे तरुणांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  अशातच नैराश्याचे वातावरण आजुबाजूला निर्माण झाल्यामुळे आणि भविष्याचा वेध घेणे कठीण झाल्यामुळे अनेकांच्या मनात चलबिचलता आली आहे. जर तुम्हालाही असेच काहीसे वाटत असेल तर तुम्ही आताच याकडे लक्ष द्या कारण कोरोनापेक्षाही भयंकर अशा मानसिक आजाराने सगळ्यांना ग्रासलेले आहे. जाणून घेऊया या आजारातून बाहेर पडण्यासाठीच्या टिप्स

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

गाणी ऐका

गाणी ही नेहमीच सगळ्यांना रिलॅक्स करण्याचे काम करतात. ज्यावेळी तुमच्या मनात वाईट विचारांचे काहूर माजेल त्या प्रत्येकवेळी तुम्ही तुमच्या आवडीची गाणी लावून ऐका. कधीकधी अशी गाणी ऐकल्यामुळेही मन दुसरा विचार करु लागते. उडती गाणी, प्रेमाची गाणी ऐकली की, आपोआपच मनात चांगले विचार येतात. इतर वेळीही जर तुम्हाला एखादी गोष्ट खटकली किंवा काही गोष्टीमुळे घाबरायला झाले असेल अशावेळीही तुम्ही गाणी ऐका. गाणी हा एक उत्तम असा मानसिक उपाय आहे. बरेचदा गाणी ऐकताना आपण त्यामध्ये इतके जोडले जातो की, त्यामुळे इतर काहीही विचार करायलाही आपल्याकडे फारसा वेळ नसतो. त्यामुळे संध्याकाळी किंवा फावल्यावेळी फेरफटका  मारताना आवडीची गाणी ऐकत चाला. 

मासिक पाळी सुरु असताना महिलांनी घ्यावी का कोरोना लस, जाणून घ्या तज्ञ्जांचा सल्ला

फिटनेसकडे लक्ष द्या

कामांच्या इतर व्यापामध्ये तुम्ही नेहमी म्हणत असाल की, मला शरीर कमवायचे आहे. पण वेळ नसल्यामुळे तुमची ही इच्छा म्हणावी तशी कधी पूर्ण झाली नसेल तर आता हीच ती वेळ आहे शरीर कमावण्याची. दिवसातून बातम्या जितक्या वेळा पाहता त्याच्या दुप्पट आरशात जाऊन स्वत:चे शरीर पाहा. तुम्हाला शरीर सुधारण्याची गरज आहे हे लक्षात आले असेल तर त्यानुसार तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात करा.  फिटनेस राखण्यासाठी जीमची गरज नाही. घरात राहून साधी योगासन किंवा अगदी तासभर नाचूनही तुम्हाला फिटनेस अगदी आरामात राखता येतो. त्यामुळे शरीराकडे लक्ष द्यायला घ्या. शरीर कमावण्यासारखे चांगले काम नाही. 

गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

नवीन काहीतरी करा

फिटनेस जसं तुम्हाला महत्वाचे आहे.  तितकचं नवीन काहीतरी शिकणे हे देखील फार महत्वाचे आहे. ज्यावेळी तुम्हाला नवीन काय शिकायचं असा विचार जरी केला तरी तुमचे डोकं वेगळा विचार करायला लागते. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता. घरी राहून विचार वेगळे करण्यासाठी भरतकाम, शिवणकाम, बेकिंग, कुकिंग असे काहीतरी शिका त्यामुळे आपोआपच काहीतरी नवीन करण्यासाठी तुमचे मन तयार राहील. कोरोनाच्या परिस्थितीशी आपले काही घेणं-देणं नाही, असा विचार करा आणि तुम्हाला काय करायचे होते ते बघा. तुम्हाला जर काहीतरी नवीन करायला मिळाले तर नक्कीच तुम्ही नको त्या गोष्टींच्या विचारातून बाहेर पडेल. 

आता कोरोनाने काय केलं? किती नुकसान झालं यापेक्षाही तुम्हाला या काळात काय करता येईल याचा विचार करा.

Read More From Fitness