DIY लाईफ हॅक्स

मासे खायला आवडतात? मग या गोष्टी ठेवा लक्षात

Leenal Gawade  |  Nov 8, 2021
मासे खाताना या गोष्टींचा करा विचार

मासे हा खूप जणांच्या आवडीचा विषय आहे. खूप जणांना आठवड्यातून एकदा तरी मासे खायचेच असतात. मासे चवीला जितके चविष्ट असतात आरोग्यासाठी ते तितकेच चांगले देखील असतात. माशामध्ये असलेले फिश ऑईलचे फायदे (Fish Oil Benefits In Marathi), तसंच त्यातून मिळणारं प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स त्वचा आणि केसासाठी फारच फायद्याचे असतात. पण मासे खाताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे असते. मासे खाताना तुम्ही नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते देखील जाणून घेऊया.

मासे स्वच्छ करताना

बाजारात वेगवेगळे मासे मिळतात. प्रत्येक मासे स्वच्छ करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. खवली असलेली मासे साफ करण्यासाठी त्याचे डोळे आणि डोके काढून त्याला आतून साफ केले जाते. कोळंबीसारखे मासे त्याचे वरील कवच काढून कोळंबी काढू शकते. कोळंबीतील धागा काढून मगच तो शिजवला जातो.खेकड्यासारखे मासे हे स्वच्छ करताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मासे स्वच्छ करताना तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी. मासा जो असेल त्यानुसार तुम्हाला मासे स्वच्छ करायचा आहे.

मासे  शिजवताना

मासे हे पटकन शिजतात. त्यामुळे त्यांना खूप शिजवण्याची गरज नसते. मासे तळताना किंवा शिजवताना त्याची आच मंद असावी. मासा एका बाजूला पूर्ण शिजल्यानंतर मगच दुसऱ्या बाजूला परतावे. असे केल्यामुळे मासा चांगला शिजतो. चिकन-मटनच्या तुलनेत मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मासे शिजवताना ते सतत परतत राहू नका. कारण त्यामुळे माशाची चव निघून जाते. माश्याचा एक सॉफ्टनेस निघून जातो. त्यामुळे मासे शिजवताना तुम्ही या काही टिप्स लक्षात ठेवा. त्यामुळे मासे चांगले राहतात.

मासे साठवताना

माशाची थाळी

खूप जणांच्या आजुबाजूला मासळी बाजार नसतो. त्यामुळे एकदाच मासे आणून घरात ठेवायला खूप जण पसंत करतात. मासे एकदाच भरपूर आणले तरी चालू शकतात. पण ते जास्त काळासाठी स्टोअर करु नका. फार फार चार दिवस मासे ठेवणे चालू शकते. पण त्याहून अधिक काळ ठेवल्यामुळे मासे खराब होऊ लागतात. इतकेच नाही तर मासे स्वच्छ करुन ठेवू नका. मासे कच्चे आणि तसेच ठेवले तर ते अधिक टिकतात. मॅरिनेट करुन तर मासे अजिबात ठेवू नका. कारण त्यामुळेही ते खराब होण्याची शक्यता असते. 

मासे घेताना

 मासे घेताना देखील तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. हल्ली बाजारात मासे हे स्टोअर किंवा बर्फातले मासे मिळतात.ज्या माशांचे डोळे लाल झालेले असतात असे मासे शक्यतो घेऊ नका. कारण असे मासे जुने आणि शिळे असतात. शक्यतो असे मासे तुम्ही घेऊ नका. मासे हे नेहमी कडक असायला हवे. गिळगिळीत असलेले मासे हे आतून खराब होण्याची शक्यता असते.त्यामुळे मासे घेताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. 

आता मासे खाताना तुम्हाला माशांबद्दलच्या या गोष्टीही माहीत असायला हवा.

अधिक वाचा

झक्कास कोळंबी रेसिपी (Kolambi Recipes In Marathi)

विभिन्न प्रकारच्या आमटी रेसिपी मराठीतून (Amti Recipe In Marathi)

मासे आणि चिकन धुताना ही घ्या काळजी.. अन्यथा होईल नुकसान

Read More From DIY लाईफ हॅक्स