DIY लाईफ हॅक्स

उन्हाळ्यात रात्रीचा उकाडा कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Trupti Paradkar  |  Apr 25, 2019
उन्हाळ्यात रात्रीचा उकाडा कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

उन्हाळा सुरू झाला की रात्री झोप येण्याची समस्या अनेकांना सतावू लागते. कारण उन्हाळ्यात एप्रिल ते जूनच्या पहिल्या आठवडयापर्यंत उन्हाची काहिली अक्षरशः असह्य होते. दिवसा प्रखर ऊन आणि रात्रीचा उकाडा यामुळे झोप पुर्ण होत नाही. जर तुम्ही शहरात रहात असाल तर बाहेरील उकाडा कमी करण्यासाठी ए.सी. अथवा कुलरचा पर्याय असू शकतो. मात्र जर तुमच्याकडे थंडावा निर्माण करणारी साधने नसतील तर या काही सोप्या आणि घरगुती टीप्स फॉलो करून तुम्ही घरात थंडावा निर्माण करू शकता. शिवाय या सोप्या टीप्समुळे उन्हाळ्याच्या त्रासदायक रात्रींमध्येदेखील तुम्हाला शांत झोप लागेल.

कॉटन आणि हलक्या रंगाच्या बेडशीट वापरा

उन्हाळ्यात तुमचे अंथरूण फारच महत्त्वाचे ठरते. यासाठी अंथरूण आणि  पांघरूण सुती कापडापासून तयार केलेले आणि हलक्या रंगाचे असेल याची काळजी घ्या. कारण त्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसा थंडावा मिळेल. सुती कापडामध्ये हवा सतत खेळती राहते.

घराच्या खिडक्यांमध्ये एकझॉस्ट फॅन लावा

घरात एसी नसेल तर खिडकीत एकझॉस्ट फॅन लावा. ज्यामुळे घरातील गरम हवा बाहेर टाकली जाईल आणि बाहेरील थंड हवा घरात येईल.

झोपताना सुती कपडेच घाला

झोपताना तुम्ही कोणते नाइटवेअर वापरता याचा तुमच्या गाढ झोपेशी संबध असू शकतो. झोपताना सुती आणि सैल कपडे परिधान करा. ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येणार नाही  आणि शांत झोप लागू शकेल.

तुमची नेहमीची उशी बदला

डोक्याखाली उशी घेऊन झोपण्याची सवय असेल तर तुमची उशी उन्हाळ्यात बदला. कारण फ्लपी उशी घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला जास्त उकडू शकते. त्याएवजी आकाराला छोट्या आणि थोडी फर्म उशी डोक्याखाली घ्या.

रात्रीचे केस धुवा

जर तुम्हाला फार उकडत असेल तर झोपण्यापूर्वी अंघोळ करा आणि केस देखील धुवा. रात्रीचे केस ओले असतील तर तुम्हाला थंडावा मिळेल  आणि झोप चांगली लागेल.

जमिनीवर झोपा

जाड गाद्या आणि उंच पलंगावर झोपण्यापेक्षा जमिनीवर झोपा. झोपण्यासाठी सटई अथवा साधी बेटशीट अंगाखाली घ्या. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागेल

अंथरूणाशेजारी थंड पाण्याची बाटली ठेवा

एखादी पाण्याची बाटली दिवसभर फ्रिजरमध्ये ठेवा आणि रात्री झोपताना ती तुमच्या अंथरूणाजवळ ठेवा. बाटलीतील पाण्याच्या ठंडाव्यामुळे तुम्हाला छान झोप लागेल.

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

बेडरूमच्या खिडक्या उघड्या ठेवा

जर तुम्ही इमारतीत उंचावर राहत असाल तर बेडरूमच्या खिडक्या उघड्या ठेवा. शिवाय खिडकीचे पडदे ओले करा किंवा खिडकीत एखादी ओली चादर अडकवून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक थंड हवा मिळू शकेल.

रात्री हलका आहार घ्या

उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा. जेवताना नेहमीपेक्षा हलका आहार घ्या. कारण जड जेवण केल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते.

कपड्यांशिवाय झोपायला आवडत असेल तर माहीत हव्यात 7 गोष्टी

रात्री झोपण्यापूर्वी वाळ्याचे पाणी प्या

रात्री झोपण्यापूर्वी वाळ्याचे पाणी अथवा सरबत प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील तापमान रात्रीचे नियंत्रित राहण्यास मदत होईल.

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From DIY लाईफ हॅक्स