आज प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडून डिजिटल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियाने आज सगळे जग एकमेकांशी बांधले गेले आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकणे, कविता, लेख लिहिणे तसेच आपापल्या कला सादर करणे सोपे झाले आहे. त्यासाठीच अनेक साईट्स देखील उपलब्ध झाल्या आहेत ज्यावर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजपासून तर सर्वसामान्य माणसापर्यंत सगळेच लोक आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. आज जगभरात लाखो लोक इंस्टाग्राम वापरतात. या प्लॅटफॉर्मने लोकांसाठी असे एक व्यासपीठ तयार केले आहे, जिथे ते एकमेकांशी सहजपणे त्यांचे कन्टेन्ट शेअर करू शकतात. भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यापासून इंस्टाग्राम रीलचा आलेख झपाट्याने वाढत आहे. इंस्टाग्रामवर आजकाल रील्स खूपच ट्रेण्डिंग आहेत. तासंतास हे रील्स बघण्यात कसे निघून जातात हे आपल्या लक्षात देखील येत नाही. लाखो लोक त्यांचे मजेदार रील्स बनवत आहेत आणि ते इंस्टाग्रामवर एकमेकांसोबत शेअर करत आहेत. अर्थात पंधरा सेकंद ते एक मिनिटापर्यंत असलेले हे रील्स बनवणे वाटते तेवढे सोपे नाही.
इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि एवढ्या मेहनतीनंतर रीलवर जास्त लाईक्स मिळणे आणि इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवणे देखील सोपे नाही. तुम्ही खूप मेहनत करून चांगले कन्टेन्ट असलेले रील्स बनवत असाल आणि तरीही त्यावर कमी लाईक्स येत असतील व तुमचे फॉलोअर्स वाढत नसतील तर निराश होऊ नका. अधिक लाइक्स आणि फॉलोअर्ससाठी रील बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.आम्ही तुम्हाला अशाच काही युक्त्या सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या रीलवरील लाईक्सही वाढतील आणि फॉलोअर्सची संख्याही वाढेल.
ट्रेंडिंग विषयांवर व्हिडिओ बनवा
तुम्हाला इंस्टाग्राम रील्सवर अधिक लोकांचे लाईक्स मिळवायचे असतील तर ट्रेंडिंग विषयांवर रील बनवा. ट्रेंडिंग विषयांवर रील बनवून तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. कारण बरेच युझर्स हे ट्रेंडिंग म्यूझीक, ट्रेंडिंग डान्स किंवा ट्रेंडिंग विषयावरील रील सतत पाहण्याचा आनंद घेतात. तुम्हीही तोच ट्रेंड फॉलो केलात तर तुमचे रील अधिकाधिक युझर्सपर्यंत पोहोचते आणि लाइक्स वाढण्याची शक्यता वाढते. जर लोकांना तुमचे काही रील्स आवडले तर ते तुमचे रील्स बघण्यासाठी तुम्हाला फॉलो देखील करतात.
ट्रेंडिंग म्युझिक ट्रॅकची निवड करा
इंस्टाग्राम रील्सच्या बॅकग्राउंडला लोक त्याला साजेसे म्युझिक ट्रॅक ठेवतात. किंबहुना एखादे म्युझिक ट्रेंडिंग होते आणि मग लोक त्यावर विविध रील्स बनवतात. असे अनेक म्युझिक ट्रॅक आहेत, जे ट्रेंडमध्ये आहेत. त्या ट्रेंडिंग म्युझिक ट्रॅकवर तुम्ही रिल्स बनवायलाच हवेत. हे म्युझिक तुमच्या रीलला अधिक पसंती मिळवून देईल. ट्रेंडिंग विषयांप्रमाणे, इंस्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये ट्रेंडिंग म्युझिक ट्रॅकचीही खूप क्रेझ आहे.
अधिकाधिक व्हिडिओज बनवा
तुमच्या रील्सवर सुरुवातीला कमी लाईक्स आणि व्ह्यूज असतील तरी निराश होऊ नका. मोठमोठ्या प्रसिद्ध इन्फ्ल्यूएंसर्सने देखील अशीच हळू सुरुवात केली होती. पण त्यांनी चांगले कन्टेन्ट देण्यात सातत्य राखल्याने त्यांचे फॉलोवर्स हळूहळू वाढत गेले. म्हणूनच तुम्हीही काही ठराविक अंतराने रील बनवून शेअर केले पाहिजे. यामुळे इंस्टाग्रामवर तुमचे व्ह्यूज वाढतील आणि लोक तुम्हाला फॉलोही करू लागतील. तुम्ही सातत्याने चांगल्या आशयाचे रील बनवले तर ते लोकांना आवडतील.
रील्सचा दर्जा सांभाळा
भरपूर रील्स बनवताना त्यात एकसुरीपणा येणार नाही याची काळजी घ्या. रील्सची संख्या वाढवताना त्यांचा दर्जा देखील सांभाळायला हवा. तुमचे कन्टेन्ट वेगळे आणि दर्जेदार असेल तर ते लोकांना आवडेल. लोक ते एकमेकांना शेअर करतील व तुम्ही अधिकाधिक युझर्सपर्यंत पोहोचू शकाल. म्हणूनच रील्सचा दर्जा राखणे सर्वात महत्वाचे आहे.
तसेच व्हिडीओ अपलोड करताना योग्य ते हॅशटॅग वापरले तर इंस्टाग्राम स्वतःच तुमचे रील अधिक लोकांपर्यंत पोहोचवते. इंस्टाग्रामचे अल्गोरिदम अधिक लोकांकडे तुमच्या रील्सची शिफारस करेल.
Photo Credit – istock
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक