Nail Care

रात्री पायांची अशी घेतली काळजी तर पाय दिसतील सुंदर

Leenal Gawade  |  Jul 4, 2021
रात्री पायांची अशी घेतली काळजी तर पाय दिसतील सुंदर

पायांच्या सौंदर्याबाबत तुम्ही ही अगदी आग्रही असाल तर आजचा विषय हा तुमच्यासाठी फारच महत्वाचा आणि आवडीचा असणार आहे. कारण चेहऱ्याच्या सौंदर्याकडे अधिक लक्ष देणारे आपण कायमच इतर त्वचेची काळजी घेण्यास विसरुन जातो. म्हणूनच खूप वेळा तोंड रंगवले जाते… पण खरा रंग हा त्वचेच्या रंगावरुन कळतो ते उगाच म्हणत नाही.सुंदर चेहऱ्याला पाय शोभावे असे वाटत असेल तर तुम्ही पायांची काळजी घेणेही फार गरजेचे आहे. दिवसभरात पायांची काळजी घेणे शक्य नसेल पण संध्याकाळी तुम्ही योग्य पद्धतीने पायांची निगा राखली तर तुमचे पाय हे नक्कीच खूप सुंदर दिसतील. यासाठी रोज तुम्हाला काही गोष्टी अगदी आवर्जून करायव्या लागतील.

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

Instagram

नखांची स्वच्छता

नखांची स्वच्छता ही देखील पायांची काळजी घेण्यासाठी फार महत्वाची असते. पाय स्वच्छ दिसायचे असतील तर शक्य असेल तेव्हा नखांची स्वच्छता करा. नखं स्वच्छ असतील तर पाय स्वच्छ दिसतो.  नखांची स्वच्छता करण्यासाठी बाजारात काही खास साहित्य मिळतात. त्याने नखं  स्वच्छ करण्यास मदत मिळते. नखांची स्वच्छता करताना नखांवर जमणारी मृत त्वचा काढून टाका. कारण त्यामुळेही नखं खराब होतात. त्यामुळे नखांची आतून बाहेरुन स्वच्छता करणे देखील फारच महत्वाचे असते.  त्यामुळे नखांची स्वच्छता वरचेवर करत राहा. त्यामुळे तुम्हाला सतत पेडिक्युअर करायची गरज भासणार नाही.

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)

पाय धुताना

पाय धुणे हे पायांच्या स्वच्छतेसाठी फारच महत्वाचे आहे. पाय रोज धुणे हा हायजीनचा भागच आहे. पण पाय स्वच्छ धुणे हे देखील तितकेच गरजेचे आहे.  रात्री झोपताना पाय धुवायचे असतील तर तुम्ही पाय रोज साबणाने चोळून धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तुम्ही पायाला स्क्रब लावून चोळा. त्यामुळे पायांवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत मिळते.  त्यामुळे चांगले सी सॉल्ट स्क्रब वापरा त्यामुळेही तुम्हाला फायदा मिळेल. याशिवाय तुम्ही कॉफी स्क्रब देखील वापरु शकते. 

नेलपेंटसचे हे १० शेड तुमच्याकडे असायलाच हवेत – Nail Paint Shades In Marathi

रात्री झोपताना

Instagram

रात्री झोपताना तुम्ही पायांची काळजी घ्यायची घेताना पाय स्वच्छ केल्यानंतर तुम्ही पायांना मॉश्चरायझर लावा. पायांना मॉश्चरायझर लावल्यामुळे पायांची कोमलता टिकून राहते. पायांसाठी चांगल्या दर्जाचे मॉश्चरायझर लावा. जमल्यास पायांमध्ये सॉक्स घालून झोपा. त्यामुळे पायांना मॉश्चरायझर टिकून राहते.त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही पायांना मॉश्चरायझर रोज लावा.   

फुट मास्क

हल्ली पायांसाठीही खास फुट मास्क मिळतात. हे फुट मास्क पायांसाठी फारच फायद्याचे असतात. जर तुम्ही फुट मास्कचा वापर केला तर पायांना इन्स्टंट  सॉफ्टनेस मिळतो. फुट मास्क हे शीट मास्कप्रमाणेच असतात. हल्ली बाजारात ते सहज मिळतात. खूप मोठ्या सलोनमध्ये हे असे फुटमास्क ट्रिटमेंट खूप महागात विकले जातात. अशावेळी तुम्ही घरीच जर असे फुट मास्क आणले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळू शकेल. 


आता रोज रात्री पायांची अशी काळजी घ्या म्हणजे तुम्ही सुंदर दिसाल.

Read More From Nail Care