आरोग्य

लहान मुलांमध्ये होणारी गॅसेसची समस्या आणि त्याचे व्यवस्थापन

Dipali Naphade  |  Oct 22, 2021
Gas-problems-in-young-children-and-its-management

महामारीच्या काळात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शारीरीक हलचाली मंदावली असून वजन वाढणे, पाठीचे तसेच मानेचे दुखणे,ऑनलाईन क्लासमुळे डोळ्यांचे दुखणे तसेच खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे मुलांमध्ये देखील गॅसची समस्या सर्वसामान्यपणे आढळून येऊ लागली आहे. जर मुलाला अस्वस्थता जाणवत असेल तसेच ओटीपोटाचा त्रास जाणवत असल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. मुलांमध्ये गॅसच्या समस्यांना आळा घालण्यासाठी, त्यांच्या रोजच्या आहारातील द्रवपदार्थाचे सेवन पुरेसे आहे की नाही हे तपासा, त्यांना फायबर युक्त अन्न खाण्यास प्रोत्साहन द्या, आम्लयुक्त पदार्थ अति प्रमाणात सारखेचे प्रमाण असलेले पदार्थ देणे शक्यतो टाळाच. हली खाण्याच्या चूकीच्या सवयी आणि इतर घटकांमुळे, मुलांमध्ये गॅसची समस्या ही एक सामान्य घटना आहे ज्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. सुरेश बिराजदार, बालरोग व नवजात शिशू तज्ञ , मदरहुड हॉस्पिटल, खारघर यांच्याकडून. 

कारणे कोणती

आहारात अचानक झालेले बदल, दुधात किंवा दुधाच्या कोणत्याही पदार्थामध्ये असलेले लॅक्टोजमुळे येणा-या पोटाच्या समस्या, अन्न योग्यरित्या चावून न खाणे, जेवताना जास्त हवा गिळणे, पुरेसे पाणी न पिणे, फ्लावर, कोबी, शतावरी, ब्रोकोली यासारख्या भाज्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे. तसेच जंक फूड, मसालेदार, तेलकट पदार्थांच्या सेवनाने गॅसची समस्या होऊ शकते. मुलांमध्ये गॅसची समस्या साखरयुक्त पचायला जड असलेले पदार्थ, फळांच्या रसांमुळे उद्भवते. कार्बोनेटेड पेयांमध्ये फॉस्फोरिक एसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. जेव्हा मुले जेवताना फिरतात आणि खेळतात किवा घाईघाईत अन्नपदार्थांचे सेवन करतात तेव्हा त्यांच्या आतड्यांसंबंधी समस्या वाढू शकतात. जर तुमचे मुल एखादी क्रिया करण्यात व्यस्त असताना अन्नाचे सेवन करतो जसे की व्हिडिओ पाहणे,व्हिडीओ गेम्स खेळणे अशा वेळी शरीराकडून येणा-या संकेतांकडे दुर्लक्ष होऊन आहाराचे अतिसेवन अथवा अपुरे सेवन होण्याची शक्यता असते आणि ही परिस्थिती देखील गॅसेसची समस्या होण्यास कारणीभूत ठरते.

लक्षणे:

मुलांमध्ये गॅसच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय:

एकदम लहान मुलांना बोलता येत नाही. पण या समस्या होऊ नयेत यासाठी काय करणे आवश्यक आहे याबाबत आपण अधिक माहिती घेऊ. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची काळजी घेणे आवश्यक असते. विशेषतः बाळाला बोलायला यायला लागेपर्यंत त्याला नक्की काय होतंय हे नीट पाहावे लागते. मुलांच्या गॅसच्या समस्येवर काय उपाय करायचा ते जाणून घेऊया.  

तुम्हीही या सोप्या टिप्स वापरून आपल्या मुलांची काळजी घेऊ शकता. तसंच नियमित मुलांच्या आरोग्याची तपासणी करणेदेखील आवश्यक आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य