बॉलीवूड

कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केलं का लग्न, काय आहे फोटोमागचं सत्य

Trupti Paradkar  |  May 18, 2021
कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केलं का लग्न, काय आहे फोटोमागचं सत्य

कोरिओग्राफर, अनेक डान्स शोची परिक्षक असलेली गीता कपूर चाहते आणि डान्सच्या स्पर्धकांमध्ये ‘गीता मॉं’ या नावाने प्रसिद्ध आहे. गीता कपूर अजून सिंगल असल्यामुळे या शोजमध्ये नेहमी तिच्या लग्नाची चर्चा केली जाते. सध्या गीता ‘सुपर डान्सर 4’ या शोची परिक्षक आहे. शोमध्ये होत असलेल्या गमतीजमतीमधून गीता मॉंच्या लग्नाविषयी विनोद निर्माण होणं हे चाहत्यांसाठी काही नवीन नाही. यावेळी मात्र शोमधून नाही तर गीता मॉंचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या फोटोजमध्ये गीता खूपच सुंदर दिसत असून तिने सौभाग्याचं लेणं असलेलं सिंदूर लावलं आहे. लाल सूटमधले सिंदूर लावलेले हे फोटोपाहून सोशल मीडियावर गीता कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी जाणून घ्या काय आहे गीता कपूरच्या गुपचूप लग्नामागचं सत्य

काय आहे गीता कपूरच्या लग्नामागचं सत्य –

गीता कपूरचे सिंदूरवाले फोटो पाहून चाहत्यांनी गीता मॉंने गुपचूप लग्न केलं का असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गीता कपूरनेही या प्रश्नांवर उत्तर देत हे फोटोशॉप केलेले फोटो नसून तिने खरंच सिंदूर लावलं आहे असं सांगितलं आहे. एवढंच नाही तर गीताने या फोटोमागचं सत्य देखील चाहत्यांसमोर उघड केलं आहे. गीताचे हे फोटो पाहून कुणीही तिचं  लग्न झालं आहे असा अंदाज बांधू शकतं. मात्र गीताने याबाबत खुलासा केला आहे की, तिने गुपचूप लग्न केलेलं नाही. याचं कारण तिला गुपचूप लग्न मुळीच करायचं नाही. शिवाय ती सध्या लग्न करू शकत नाही कारण काही महिन्यांपूर्वीच तिची आई गेली आहे. आईच्या निधनानंतर ती लगेच लग्न कसं करेल असा उलट प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे. गीताने सिंदूर लावलं आहे हे जरी सत्य असलं तरी यामागचं कारण सुपर डान्सर 4 चं फोटोशूट आहे. कारण नुकताच या शोचा एक असा एपिसोड शूट करण्यात आला आहे ज्याची थीम होती एव्हरग्रीन अभिनेत्री… गीता या शोमध्ये बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री रेखाप्रमाणे तयार झाली आहे. रेखाप्रमाणे लाल रंगाचे कपडे आणि सिंदूर लावल्यामुळे गीताच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती.  शिवाय गीताच्या मते तिने आधीदेखील अनेक वेळा सिंदूर लावलं आहे. कारण ती भगवान शंकराची भक्त आहे. शिवभक्त  असल्यामुळे ती दर सोमवारी सिंदूर लावते. त्यामुळे तिच्या मते सिंदूर लावण्याशी  तिच्या  लग्नाचा सध्या तरी काहीच संबध नाही.

गीताच्या आईची शेवटची इच्छा

गीता कपूर नेहमी शोमधून व्यक्त होते की तिच्या आईला तिला नववधूच्या रूपात पाहायचं होतं. मात्र गीता आईची ही इच्छा पूर्ण करू शकली नाही. कारण या वर्षीच्या जानेवारीत तिच्या आईचं निधन झालं. गीताच्या मते तिच्या आईसाठी मागील काही वर्ष खूपच त्रासदायक होती. मात्र तिला आता नक्कीच शांती आणि मोक्ष मिळाला असेल.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

‘कोरोना काळातील प्रेम’ म्हणत शिल्पाने हटके स्टाईलने केलं राज कुंद्राला किस

पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यास पुढाकार

लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता 2’, मानवचा शोध सुरु

Read More From बॉलीवूड