Acne

व्हाइटहेड्स वर करा घरच्या घरी उपाय आणि मिळवा क्लीअर त्वचा (How To Get Rid Of Whiteheads)

Leenal Gawade  |  Jun 27, 2019
व्हाइटहेड्स वर करा घरच्या घरी उपाय आणि मिळवा क्लीअर त्वचा (How To Get Rid Of Whiteheads)

तुमचा चेहरा तुम्ही कधी नीट आरशात निरखून पाहिला आहे का? तुम्हाला तुमच्या पोअर्समधून जर पांढरे काहीतरी आल्यासारखे वाटत असेल तर त्याला व्हाइटहेड्स असे म्हणतात. जर तुम्ही व्हाइटहेड्स कडे दुर्लक्ष केले तर ते पुढे जाऊन ब्लॅकहेड्स होतात. जर तुम्हालाही व्हाइटहेड्सचा त्रास असेल तर तुम्ही घरच्या घरी यावर काही उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील काही गोष्टींचा वापर करुन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील व्हाइटहेड्स पासून सुटका मिळवून क्लीअर त्वचा मिळवू शकता.

कोणाला होऊ शकतो व्हाइटहेड्स त्रास? (What Causes Whiteheads)

आता सगळ्यांनाच हा त्रास असेल असे नाही. तुमची त्वचा जर मिश्र किंवा तैलीय असेल तर अशा त्वचेच्या व्यक्तींना हा त्रास हमखास होऊ शकतो. चेहऱ्यावरील पोअर्स मोठे झाल्यामुळे त्यात घाण जाऊन तुम्हाला Whiteheadsचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्याची योग्य काळजी घ्यायला हवी.

घरच्या घरी सोप्या पद्धतीने काढता येतील ब्लॅकहेड्स

आता जाणून घेऊया काही घरगुती उपाय (Home Remedies To Remove Whiteheads)

अॅलोवेरा जेल (Aloe Vera Gel)

ऑईली त्वचा असणाऱ्यांसाठी अॅलोवेरा जेल एकदम बेस्ट आहे. तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला कोणते मॉश्चरायझर लावायचे कळत नसेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अॅलोवेरा जेल लावू शकता. त्यामुळे तुमचे मोठे पोअर्स काही काळासाठी बंद राहतील त्यामध्ये घाण जाणार नाही.

अंड्याचा पांढरा बलक (Egg White)

अंड्याचा पांढरा बलक तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करुन तुमच्या पोअर्समधील घाण काढण्यास मदत करते. एक अंड घेऊन त्याचा पांढरा बलक वेगळा करा. वेगळा केलेला पांढरा बलक चांगला फेटून घ्या. बलक छान पांढरा झाल्यावर तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला किमान 20 मिनिटे लावून ठेवायचा आहे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे. आठवड्यातून किमान दोनदा तरी हा प्रयोग करुन पाहा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामधील फरक जाणवेल.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे आहेत हे 5 आहेत फायदे

टी बॅग्ज (Tea Bags)

कोणत्याही टी बँग्ज तुम्ही  वापरल्यानंतर फेकून देता पण आता असे करु नका. कारण त्या तुमच्या त्वचेसाठी चांगल्या असतात. वापरुन झालेल्या टी बॅग्ज तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायच्या आहेत. या टी बॅग्जचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्हाला ओपन पोअर्सचा त्रास असेल तर तुमचे ओपन झालेले पोअर्स लहान होऊ शकतात. 

जर तुम्ही टी बॅग्ज वापरत नसाल तर तुम्ही तुमच्या रोजच्या चहाची पावडर देखील वापरु शकता. तुम्हाला उरलेल्या चहाची पावडर त्याचे घेऊन तुमच्या चेहऱ्याला चोळायची आहे. 

कडुनिंब आणि हळद (Turmeric)

तुमच्या त्वचेवरील मुरुम घालवण्यासाठी कडुनिंब उपयुक्त आहे ते तुम्हाला माहीत असेलच पण अन्य समस्यांसाठीही कडुनिंब चांगले आहे. तुम्हाला कडुनिंब आणि हळद एकत्र करुन हा पॅक चेहऱ्याला लावायचा आहे. यामुळे तुम्हाला Whiteheads चा असलेला त्रास कमी होईल

हे टाळा (Avoid This To Prevent Whiteheads)

You Might Like These:

काळ्या डागांवर करा घरगुती उपाय (Home Remedies For Dark Underarms In Marathi)

म्हणून महिलांनी नियमित वापरायला हवे पँटी लायनर

Read More From Acne