बॉलीवूड

Ghost stories … गुंतवणाऱ्या पण तितक्याच फॅन्सी

Leenal Gawade  |  Jan 1, 2020
Ghost stories … गुंतवणाऱ्या पण तितक्याच फॅन्सी

लहानपणी सगळ्यांनीच रत्नाकर मतकरी यांच्या भूताच्या गोष्टी वाचल्या असतील. त्यांच्या भूताच्या गोष्टीत आक्राळ- विक्राळ भूत नसायचं पण ती गोष्ट एकदा वाचायला घेतली ती संपेपर्यंत पुस्तक ठेवावेसे वाटायचे नाही. त्यांनी लिहिलेली गोष्ट वाचून झाली की, डोक्यामध्ये विचारचक्र सुरु व्हायचे. भूतांच्या गोष्टी वाचायला हल्ली जमत नसल्या तरी त्या चित्रपट रुपाने किंवा सिरिअल रुपाने आपण पाहत असतो. त्यातील काही गोष्टी तुमच्या लक्षात नक्कीच राहिल्या असतील. जर तुम्ही भूतांच्या गोष्टी पाहण्यासाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी नेटफ्लिक्सवर Ghost stories नावाचा एक चित्रपट आला आहे. या एका चित्रपटात चार गोष्टी असून तुम्हाला एकाचवेळी वेगवेगळ्या विकृती आणि नकारात्मक शक्तींचा ते परिचय यामधून करुन देतात.जाणून घेऊया Ghost storiesचा रिव्ह्यू

नव्या वर्षात नवा लुक हवा असेल तर बजेटमध्ये करा हे बदल

स्टोरी डोक्याला मुंग्या आणणाऱ्या

Instagram

Ghost stories मध्ये एकाचवेळी चार वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. झोया अख्तर, अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, करण जोहर यांनी या वेगवेगळ्या चार कथांचे दिग्दर्शन केले आहे. एकूणच सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला तर ट्रेलरपेक्षा यामधील कथा फारच क्षुल्लक वाटतात. कदाचित त्या इतक्याही घाबरवत नाहीत. आता याचा रिव्ह्यू द्यायचे झाले तर झोया अख्तरची पहिली कथा ही एका अंथरुणावर पडलेल्या एका आजीची गोष्ट आहे. यामध्ये जान्हवी कपूरने एका नर्सची भूमिका साकारली आहे. दुसऱ्या नर्सच्या जागी बदली म्हणून गेलेल्या जान्हवीसोबत घरात वेगवेगळ्या गोष्टी घडतात. या गोष्टीत प्रत्यक्षात भूत असं काही दिसत नाही. पण या कथेचा शेवट मात्र डोक्यामध्ये 100 प्रश्न निर्माण करतो. 

दुसरी कथा आहे अनुराग कश्यप दिग्दर्शित या गोष्टीमध्ये सोबीचा धुलीपाला मुख्य भूमिकेत आहे.   भाचा आणि मावशीची ही कथा असून ही कथा पाहताना डोक्याला मुंग्या आल्यावाचून राहत नाही. सोबीता धुलीपालाचा  अभिनय हा यामध्येही उत्कृष्ट आहे. लवकरच आई बनणाऱ्या या नायिकेसोबत असे काही अचानक बदल होतात की, त्यामध्ये एक हैवान जाऊन बसतो. असा हैवान जो स्वत:च्या मुलाला खाऊन टाकतो. ही कथा जुन्या काळातील दाखवण्यात आली आहे. याचा सेटअप दिग्दर्शन  पहिल्या कथेच्या तुलने अधिक चांगले आहे. 

तिसरी कथा दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित आहे. एका गावामध्ये नोकरीसाठी गेलेल्या माणसाला त्या गावात काय वाढून ठेवले माहीत नसते.त्या गावात माणसांना खाणारी माणसं ( झॉम्बी) म्हटल्यास अधिक उत्तम. याकथेत सगळ्यात जास्त भाव खाल्ला आहे लहान मुलाने. या सगळ्याशी लढण्यासाठी त्याने लढवलेली शक्कल चालणार की नाही हे कळायच्या आत कथा एक वेगळेच वळण घेते. असे वळण जे कदाचित एका नव्या संकटाची सुरुवात आहे. 

करण जोहर दिग्दर्शित चौथी कथा त्याच्या दिग्दर्शन शैलीप्रमाणेच आहे. अकल्पनीय आणि उगाचच फॅन्सी. एक मुलगी लग्न करुन दुसऱ्या घरी येते. तिथे मेलेल्या आजीचा वावर असतो. घरातील सगळे या गोष्टी मानतात. पण मुलगी मानत नाही. ती नवऱ्याच्या डोक्यातून आजीविषयीच्या या गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करते पण तसे होत नाही. उलट त्यात तिचाच मृत्यू ओढावतो. असे या कथेत दाखवण्यात आले आहे. 

अनुराग आणि कोमोलिकाला 2019 मिळाली सर्वात जास्त पसंती

अभिनय तगडा

Ghost stories मध्ये घेतलेली स्टारकास्ट तगडी आहे. काहींचा अभिनयही तितकाच तगडा आहे. पण पुन्हा एकदा जान्हवी कपूरची निवड या रोलसाठी साजेशी वाटत नाही. तिच्या अभिनयात फार काही वेगळेपणा जाणवत नाही. पण दिग्दर्शन आणि कथेच्या बळावर तिचे काम त्यातल्या त्यात बरे आहे. 

जर तुम्ही Ghost stories पाहिल्या नसतील तर नक्की पाहा. कारण जो देखता है.. वही डरता है!

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा. https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From बॉलीवूड