चला आता फेस्टिव्ह सीझनला आता सुरुवात झाली आहे. या खास दिवसांसाठी आपला लुकही एकदम खास असतो. कधीही न घातले जाणारे ट्रेडिशनलवेअर या दिवसात अगदी आवर्जुन घातले जातात. अशा या ट्रेडिशनलवेअरवर तुम्हाला जर झटपट नटायचे असेल तर तुम्ही फक्त गोल्डन आयशॅडोचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करुन झटपट तयार होऊ शकता. या गोल्डन आयशॅडोचा नेमका कसा उपयोग करायचा आणि वेगवेगळे लुक मिळवायचे ते आज आपण जाणून घेऊया. करुया सुरुवात
या रंगाचे कपडे उजळवतात तुमचा स्किनटोन
मेकअप लुक 1
साहित्य : गोल्डन आयशॅडो, काजळ(स्मज होणारे असल्यास उत्तम) , आयलायनर, आयशॅडो ब्रश
असा करा लुक
- तुमचे डोळे प्रेप करुन घ्या. डोळ्यांना प्रायमर, कन्सिलर लावून घ्या.
- आता वेळ आहे पहिल्या लुकची हा लुक थोडो डीप गोल्डन असा आहे. त्यामुळे आधी बेसला न्यूड रंगाचा बेस लावून घ्य. त्यावर गोल्डन रंगाचा आयशॅडो लावून घ्या.
- डोळ्यांच्या क्रिस लाईनपर्यंत तुम्ही हा आयशॅडो लावून घ्या. तो बाहेरच्या बाजूने लावून आतपर्यंत आणा.
- आता वेळ आहे तो थोडा बोल्ड लुक तयार करण्याची ब्रशमध्ये काजळ घेऊन तुम्ही डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूने अगदी थोडेसे काजळ घेऊन ते आतल्या बाजून स्मज करत या.
- आता आयलायनर आणि मस्कारा लावून तुमचा लुक पूर्ण करा.
मेकअपमध्ये हायलायटर लावते चार चाँद, अशी करा निवड
मेकअल लुक 2
साहित्य : गोल्ड आयशॅडो, काजळ लायनर, मस्कारा, बारीक आयशॅडो ब्रश
असा करा लुक :
- कट क्रिस आयमेकअप हा सध्या फारच प्रसिद्ध आहे. हा मेकअप लुक तुम्हाला फॅन्सी लुक देतो.
- डोळे प्रेम केल्यानंतर तुम्ही डोळ्यांना कोणताही एखादा न्यूड बेस लावून घ्या.
- तुमच्याकडे कोणताही गोल्डन रंगाचा आयशॅडो असला तरी देखील तुम्हाला एक बारीक ब्रशची गरज आहे.
- डोळ्यांच्या क्रिसलाईनवर आतल्या बाजून येत मध्यापर्यंत आयशॅडोची लाईल ओढून घ्या.
- डोळ्यांना तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचे आयलायनर लावू शकता. मस्कार लावून तुमचा लाईट वेटेड आणि एकदम हटके लुक तयार
या मालिकांमधून आला टिकल्यांचा प्रसिद्ध ट्रेंड, अभिनेत्रींमुळे गाजला ट्रेंड
मेकअप लुक 3
साहित्य : गोल्डन आयशॅडो, ब्रश आणि मस्कारा
असा करा हा लुक:
- हा लुक एकदम झटपट असा होणारा आहे. तुम्हाला यासाठी गोल्डन रंगाचा आयशॅडो लागणार आहे.
- ब्रशच्या साहाय्याने आयशॅडो आयलायनरच्या जागी लावून घ्या. असे करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार आयशॅडोल लायनर जाड किंवा बारीक लावू शकता.
आता या फेस्टिव्ह सीझनला गोल्डन रंगाचा उपयोग करुन सुंदर दिसा