
पूर्वीच्या चित्रपटांमध्ये कॉमेडी भूमिका करणारे अभिनेते अगदी ठरलेले असायचे. ती व्यक्ती चित्रपटात दिसली की, हमखास पोट धरुन हसायला मिळणार हे प्रेक्षकांनी गृहीतच धरलेलं असायचं. असाच जुन्या चित्रपटामधील एक चेहरा म्हणजे जगदीप. नुकताच त्यांना आयफाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी व्हिल चेअरवर आलेल्या जगदीप यांना कोणीच ओळखू शकले नाही.
हेराफेरी 3′ मध्ये अक्षयला रिप्लेस करणार हा अभिनेता
सिनेजगतापासून दूर
जगदीप सध्या 80 वर्षांचे असून त्यांनी गेल्या 6 वर्षांपासून काम करणे पूर्णपणे सोडून दिले आहे. त्यामुळेच आता अनेकांना ते कसे दिसत असतील हे माहीत नाही. सिनेजगतापासून दुरावलेल्या जगदीप यांची प्रकृतीही फारशी ठिक नसल्यामुळे त्यांना काम करणे ही शक्य नाही. त्यामुळेच गेली 61 वर्ष लोकांचे मनोरंजन करणारा हा कलाकार सध्या कुठेही दिसत नाही. पण त्याने जितकी वर्ष कामं केली तितकी वर्ष लोकांना अभिनयाने खूश केले आहे.
मुलांसोबत आले स्टेजवर
आता तुम्हाला जगदीप यांचा चेहरा आठवला असेल तर तुम्हाला हमखास हा प्रश्न पडेल की, जयदीप यांची पुढील पिढी या क्षेत्रात आहेत की नाही तर जगदीप यांचे जावेद आणि नावेद हे दोन मुलगे असून ते तुम्हाला नक्कीच माहीत असतील. हो आम्ही जावेद जाफ्री आणि नावेद यांच्याबद्दलच बोलत आहोत. आता त्यांच्यासोबतच जावेद जाफ्रीचा मुलगाही या क्षेत्रात आला आहे. नुकताच त्याचा ‘मलाल’ हा चित्रपट येऊन गेला. जावेदमध्ये जयदीपप्रमाणेच कॉमेडीचा इसेन्स आहे. त्यामुळेच जावेद यांच्या नृत्यासोबतच त्यांची कॉमेडी अनेकांना आवडते. जावेदनेही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत.
400हून अधिक चित्रपटांत काम
जगदीप यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. 1951 साली आलेल्या ‘अफसाना’ या चित्रपटातून त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. शोल या चित्रपटात त्यांनी साकारलेली सुरमा भोपालीची भूमिका तर फारच गाजली होती. त्यांनतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्षात राहतील अशाच भूमिका साकारल्या. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
या चित्रपटानंतर केले नाही काम
जगदीप यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत. शोलेनंतर ज्या चित्रपटाचे आवर्जून नाव घेतले जाते ते म्हणजे ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात त्यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले. 2012 साली आलेला गली गली चोर है हा त्यांचा शेवटचा चित्रपट त्यानंतर त्यांनी चित्रपटातून काम केलेच नाही.
पहिलं बाळ गमावल्यावर पुन्हा ‘ही’ अभिनेत्री बनणार आई
जाफ्री कुटुंबाची तिसरी पिढी
आता तुम्हाला कळलेच आहे की, जाफ्री कुटुंबाची ही तिसरी पिढी सध्या या क्षेत्रात आहे. जावेद जाफ्रीचा मुलगा या क्षेत्रात आला असून त्याने कॉमेडीयन म्हणून नाही तर हिरो म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade