Styling

खास समारंभासाठी केसांच्या कोणत्या हेअरट्रिटमेंट कराव्यात, जाणून घ्या

Leenal Gawade  |  Jul 8, 2021
खास समारंभासाठी केसांच्या कोणत्या हेअरट्रिटमेंट कराव्यात, जाणून घ्या

घरी एखादे मंगलकार्य असेल तर केसांच्या बाबतीत सगळ्याच महिला फार आग्रही असतात. कारण निवडलेल्या खास कपड्यांवर केसही अगदी चांगले दिसायला हवे. फ्रिजी, विस्कटलेले आणि निस्तेज केस कोणालाही आवडत नाहीत.तुमच्या घरात एकामागोमाग एक असे काही कार्यक्रम असणार आहेत. त्याकालावधीत केस विंचरण्यासाठीही तुम्हाला वेळ मिळणार नसेल तर तुम्हाला काही असा हेअर ट्रिटमेंट करायला हव्यात. ज्यामुळे तुमचे केस सुटसुटीत आणि चांगले राहतील. ज्यामुळे तुम्हाला सतत केसांना स्ट्रेटनर फिरवायची गरजही भासणार नाही. चला जाणून घेऊया अशा ट्रिटमेंट्स

त्वचेवर जादू करते ऑर्गन ऑईल, जाणून घ्या फायदा

त्वचेसाठी बेस्ट आहेत लोशन बार, असे बनवा घरच्या घरी

क्युओडी (QOD)

केस कोरडे आणि फाटे फुटलेले दिसत असतील. केसांना अजिबात शाईन राहिली नाही असे वाटत असेल तर तुम्ही क्युओडी नावाची ट्रिटमेंट देखील करु शकता. तुमचे केस सरळ करण्यासोबतच तुमच्या केसांना चांगले ठेवण्याचे काम करते. हेअर स्ट्रेटनिंगचा पर्याय म्हणून आलेली ही एक अॅडव्हान्स पद्धत आहे. ज्यामध्ये केसांचा हेअरफॉल अजिबात होत नाही. केसांवर याची एक लेअर तयार झाल्यामुळे केस हे अतिशय सरळ आणि सुंदर राहण्यास मदत मिळते. ही प्रोटीन ट्रिटमेंट केल्यानंतर केस नरिश दिसतात. त्यामुळे तुम्हाला केसांना हेल्दी ठेवायचं असेल तर ही ट्रिटमेंट फारच फायद्याची आहे.

काय आहे 5:2 स्किन डाएट, जाणून घ्या फायदे आणि पद्धत

स्मुथिंग (Smoothing)

केस सिल्की, स्मुथ आणि चांगले दिसण्यासाठी ही ट्रिटमेंट केली जाते. केसांसाठी केल्या जाणाऱ्या या ट्रिटमेंटमध्ये स्ट्रेटनरचा वापर केला जातो. त्यामुळे तुमचे केस यामध्ये अगदी सरळ दिसतात. ही ट्रिटमेंट केल्यानंतर तुम्हाला केस सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा उपयोग करावा लागत नाही. तुमचे केस आहे तसेच ठेवता येतात. त्यामुळे जर तुम्हाला सरळ केसांचा लुक आवडत असेल तर तुम्ही स्मुथिंग करु शकता. त्यामुळे केस मॅनेज करणं तुमच्यासाठी अगदी सोपं जाईल. या

केरेटिन (Keratin)

स्मुथिंगचाच पुढचा प्रकार म्हणजे केरेटिन. केसांना चांगले ठेवण्यासाठी केरेटिन हा घटक फारच महत्वाचा असतो. ही ट्रिटमेंट करताना तुम्हाला केस सरळ करण्यासोबतच केसांना खास केरेटिनचे घटक पुरवले जातात. त्यामुळे तुमच्या केसांची टोक ही देखील एकदम छान राहण्यास मदत मिळते. केरेटिन ट्रिटमेंट घेतल्यानंतर केस हे अतिशय शाईनी आणि सरळ दिसतात. अशा केसांवर कोणतीही हेअरस्टाईल किंवा कलरही करता येतो. ही हेअर ट्रिटमेंट केसांसाठी एकदम बेस्ट अशी ट्रिटमेंट आहे. 

सिल्की आणि शायनी केस हवेत मग वापरा हे घरगुती हेअर मिस्ट

ग्लोबल कलर किंवा हायलाईट्स

केसांना रंग केल्यानंतर कधी कधी केस हे फारच सुंदर आणि वेगळे दिसतात. खास समारंभात तर असे हेअर कलर फारच उठून दिसतात.जर तुम्हाला थोडा बोल्ड पण सगळ्यात उठून दिसणारा असा लुक हवा असेल तर तुम्ही   ग्लोबल म्हणजे केसांना पूर्ण रंग करु शकता किंवा केसांना हायलाईट्स देखील करु शकता. 

आता कोणत्याही कार्यक्रमांपूर्वी केसांच्या या ट्रिटमेंट घ्यायला तुम्ही विसरु नका.

 

 

Read More From Styling