ट्रेजडी किंग नावाने प्रसिद्ध असलेले बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा आज वाढदिवस आहे. दिलीप कुमार गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असून आजारी आहेत. पण या काळात त्यांची बायको आणि अभिनेत्री असलेल्या सायरा बानो त्यांची हरप्रकारे काळजी घेत आहेत. स्वतः लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या सायरा बानो या जंगली, एप्रिल फूल, पडोसन, झुक गया आसमान, पूरब और पश्चिम, व्हिक्टोरिया नंबर 203, आदमी और इंसान तसंच जमीर सारख्या सिनेमांमधील अभिनयासाठी ओळखल्या जातात. तुम्हाला माहीत आहे का, ट्रेजडी किंग आणि सायरा बानो यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते. चला दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया या दोघांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी.
त्या काळातली ‘तुला पाहते रे’ जोडी
सायरा बानो यांनी 1966 साली 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं. तेव्हा दिलीप कुमार यांचं वय 44 होतं. सायरा आणि दिलीप कुमार यांची लव्ह स्टोरी खूपच प्रसिद्ध आहे. 12 व्या वर्षापासून सायरा या दिलीप कुमार यांच्या चाहत्या होत्या. जेव्हा हे प्रेम दिलीप कुमार यांना कळलं तेव्हा त्यांना काय करावं हे समजलं नाही. कारण दिलीप कुमार तेव्हा दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात होते.
दोन वेळा प्रेमाचा वाईट अनुभव
दोन वेळा प्रेमात अपयशी ठरल्याने दिलीप कुमार सायरा यांच्या प्रेमाला गंभीरतेने घेत नव्हते. वयामधील फरकाने दिलीपजी या नात्यापासून स्वतःला टाळत होते. पण त्यांना हे माहीत होतं की, सायरा यांचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे वर्ष होतं 1966. अखेर दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी आपल्या प्रेमाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. दिलीप कुमार यांच्यावर देश-विदेशातील अनेक तरूणींच प्रेम होतं. पण त्यांनी मात्र पसंती दिली ती सायरा बानो यांना. त्यावेळी सायरा त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या.
अशीही चर्चा होती की..
असंही म्हटलं जातं की, तेव्हा सायरा बानो यांचा जीव राजेंद्र कुमार यांच्यावर जडला होता. पण राजेंद्र विवाहीत होते. त्यामुळे सायरा यांच्या आई नसीन यांना जेव्हाही गोष्ट कळली. तेव्हा शेजारीच राहणाऱ्या दिलीप कुमारना त्यांनी सायराची समजूत काढण्यास सांगितलं. दिलीपजी सायरा यांची समजूत काढत असताना त्या म्हणाल्या की, तुम्हीच माझ्याशी लग्न का नाही करत आणि मग दिलीप कुमार व सायरा यांचं लग्न झालं. तर अशीही दिलीप-सायरा यांची लव्हस्टोरी.
लताजींच्या डिस्चार्जवर दिलीपजींनी व्यक्त केला आनंद
नुकतंच दिलीपजींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर ट्वीट करून आनंद व्यक्त केला होता. तब्बल 28 दिवसानंतर लताजी हॉस्पिटलमधून घरी गेल्या. दिलीपजींनी ट्वीटमध्ये लिहीलं की, हे ऐकून खूप बरं वाटत आहे की, माझी छोटी बहीण लता आता बरी आहे आणि घरी आली आहे. कृपया तू स्वतःला नीट जप. दिलीपकुमार हे लताजींचे मानलेले भाऊ आहेत. या ट्वीटसोबत त्यांनी सायरा आणि लतासोबतचा फोटोही शेअर केला.
दिलीप कुमारने 1947 मध्ये आलेला सिनेमा ‘जुगनू’ ने त्यांना पहिल्यांदा यश अनुभवायला मिळालं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिलीप कुमार यांनी देवदास, मुगल-ए-आझम यासारख्या चित्रपटात त्यांनी आपला सुंदर अभिनय सादर केला. शेवटचं ते 1998 मध्ये चित्रपट ‘किला’ मध्ये ते दिसले होते. दिलीप कुमार यांना 2015 साली पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कारही मिळाला होता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje