मनोरंजन

पाठक बाई आणि राणादाची लंडन ट्रीप चर्चेत… फोटो व्हायरल

Dipali Naphade  |  Jul 11, 2022
hardeek-joshi-and-akshaya-deodhar-london-trip-before-marriage-in-marathi

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका खूपच गाजली आणि त्यातही अधिक गाजले ते त्यातील प्रमुख भूमिकेतील कलाकार पाठक बाई अर्थात अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि राणादा अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi). या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिकेनंतर दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि काही महिन्यांपूर्वी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. मालिका चालू असताना दोघांचीही जोडी चर्चेत होती तर अगदी सोशल मीडियावरही दोघे आपले फोटो पोस्ट करत होते आणि तेव्हादेखील त्यांच्या जोडीविषयी चर्चा रंगत होती. मात्र आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे दोघांची लंडन ट्रीप (London Trip). हार्दिक आणि अक्षया संध्या लंडनमध्ये असून लग्नाआधी दोघेही फिरत आहेत (akshaya deodhar and hardeek joshi london trip before marriage), त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे. 

फोटो झाले व्हायरल 

हार्दिक जोशीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेला फोटो सध्या खूपच व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो, स्टोरीज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ही ट्रीप दोघांनीही लग्नापूर्वी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरीही अनेक जण लग्नापूर्वी असे फिरताना असे दिसून येतात. त्यामुळे यामध्ये वावगं वाटून घ्यायची काहीच गरज नाही. हार्दिकने अक्षयासह फोटो शेअर करत #london असे लिहिले आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये. प्रेमात असताना एकमेकांसह वेळ घालवणे हे सर्वात महत्त्वाचे असते आणि दोघांच्याही चेहऱ्यावरील हाच प्रेमाचा आनंद दिसून येत असल्याने त्यांचे चाहतेही खूपच आनंदी झाले आहेत. 

पुण्यात होणार लग्न 

अक्षया मूळची पुण्याची आहे. त्यामुळे लग्न हे पुण्यात होणार असून काही दिवसापूर्वीच अक्षया आणि हार्दिकने याविषयी सांगितले होते. तर हार्दिक सध्या मालिकेच्या चित्रीकरणातही व्यस्त आहे. पण लग्न अगदी आता होणार असे चाहत्यांना वाटत असतानाच अचानक पुन्हा एकदा लंडन ट्रीपचे फोटो शेअर करत या जोडीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तर काही जणांनी असा अंदाज लावला आहे की, अक्षया आणि हार्दिक हे आपल्या लग्नाचे प्रि – वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) लंडनला करत असावेत. पण आता जोपर्यंत कोणतेही फोटो दोघेही पोस्ट करत नाहीत तोपर्यंत अंदाज लावण्याशिवाय इतर काहीच करणे चाहत्यांच्याही हातात नाही. तर त्यांचे चाहते दोघे नक्की कधी लग्नबंधनात अडकणार आहेत, याकडे लक्ष देऊन राहिले आहेत. सर्वांनाच त्यांच्या लग्नाची आणि त्यांच्या लग्नातील लुकची उत्सुकता आहे. कारण साखरपुड्यामध्ये दोघेही अप्रतिम दिसत होते आणि त्यांचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. तर हार्दिकने गुडघ्यावर बसत अक्षयाच्या हातात घातलेली अंगठी हा त्यांच्या आयुष्यातील खूपच सुखद क्षण ठरला होता. त्यामुळे या lovable जोडीला लग्नबंधनात पाहण्यासाठी सर्वच उत्सुक झाले आहेत. अजूनही अक्षया आणि हार्दिकची लग्नाची तारीख न कळल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच थोडी वाट पाहावी लागेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन