मागच्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाज कौर संधूच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशनचे अनेक चाहते आहेत. मात्र सध्या तिचं वजन अचानक वाढलं आहे. ज्यामुळे ती बऱ्याचदा बॉडी शेमिंगसाठी ट्रोल होत आहे. हरनाजच्या वाढलेल्या वजनाची काही कारणे आहेत. मात्र त्याकडे लक्ष न देता मिस युनिव्हर्सने नेहमीच बॉडी शेपमध्ये असावं अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र हरनाज देखील ही तिच्या ब्युटी विथ ब्रेनमुळेच मिस युनिव्हर्स ठरली होती. त्यामुळे तिनेही तिच्या खास अंदाजामध्ये या ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाली हरनाज
हरनाजने नुकतीच एक इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बॉडीशेमिंग करणाऱ्या ट्रोलर्संना सणसणीत टोला लगावला आहे. ज्यामुळे सध्या हरनाजची ही इन्स्टा पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये शॉर्ट डीप प्लजिंग नेकलाईनचा ड्रेस परिधान केला आहे. आय मेरृकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकने तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केस मोकळे ठेवत तिने सॉफ्ट कर्ली स्टाईलने तिने हा लुक परफेक्ट केला आहे. मात्र या फोटोसोबत असलेली कॅप्शन सर्वात जास्त लक्षवेधी ठरली आहे. कारण या कॅप्शनमधून तिने बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना चपराख लगावली आहे. कारण तिने या फोटोसह शेअर केलं आहे की, “तुमच्या मेंदूचा शेप हा तुच्या बॉडी शेपपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे”
हरनाजची पोस्ट व्हायरल
हरनाज कौर संधूने भारताला जवळजवळ 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवून दिला आहे. नुकताच तिने लॅक्मे फॅशन विकमध्ये रॅंप वॉक केला होता. मात्र या कार्यक्रमात तिच्या लुकपेक्षा तिच्या बॉडीशेपला जास्त महत्त्व देण्यात आलं. तिच्या वाढलेल्या वजनाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. वास्तविक सध्या हरनाज एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. तिला सिलिएक आजार झाला आहे. ज्यामुळे ती गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ अथवा चीझ अशा गोष्टी खाऊ शकत नाही. शिवाय या आजारामुळे तिचं वजन वाढू लागलं आहे. मात्र असं असलं तरी हरनाजला तिच्या वाढणाऱ्या वजनामुळे काहीच फरक पडत नाही. कारण ती एक सकारात्मक विचार करणारी व्यक्ती आहे. ती स्वतःला एक साहसी आणि आत्मविश्वास असलेली मुलगी मानते. ज्यामुळे तिच्या मते जाड असो वा बारीक नेहमीच स्वतःवर प्रेम करत राहणार, कारण हे माझे शरीर आहे. हरनाजची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रेटीजनीं तिच्या पोस्टवर लाईक आणि कंमेटचा वर्षाव केला आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade