हात, पाय आणि चेहेरा अशा शरीराच्या अनेक भागांवर सूज येणे ही एक सामान्य समस्या आहे. बरेच लोक अंगावर सूज येणे हे गंभीरपणे घेत नाहीत आणि उपचार टाळतात. अंगावर सूज येणे ही समस्या एखाद्या गंभीर आजाराचे सूचक असू शकते. त्वचा, सांधे आणि शरीराच्या इतर ऊती आणि अवयवांना सूज येऊ शकते. साहजिकच यामुळे तुम्हाला खूप अस्वस्थ वाटू शकते. ऍलर्जी, दगदग ,प्रवास यांमुळे कधीतरी आलेली सूज सहसा आपोपाप उतरते. परंतु तुमच्या शरीरावर कुठेही सतत सूज येत असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावाआणि योग्य ती औषधे घ्यावी.
सूज येणाची कारणे आणि लक्षणे
अंगावर किंवा चेहेऱ्यावर सूज येण्याची कारणे आणि लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. म्हणूनच लक्षणे गंभीर असल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. काहीवेळा दुखापत झाल्यास हातावर, पायावर किंवा दुखापत झालेल्या जागेवर सूज येते. शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत झाल्यास, प्रभावित क्षेत्राजवळ सूज येते. यामुळे त्वचेत उष्णता व वेदना यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. काहीवेळा सूज येण्याची कारणे ही आंतरिक देखील असू शकतात. असे मानले जाते की हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारांमुळे अंगावर सूज येते. तसेच त्यासोबत वजन वाढणे, थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पाय आणि खालच्या बाजूस सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. अनेक लोकांच्या पायांवर सूज येते. त्यामागे गर्भधारणा, दीर्घकाळ उभे राहणे, पायांच्या नसांमधील लहान व्हॉल्व्ह कमकुवत होणे, प्रथिनांची कमतरता, फुफ्फुसाचा जुनाट आजार, रक्ताच्या गुठळ्या, जास्त वजन, पायाचे संक्रमण आणि वृद्धत्व अशी करणे असू शकतात.
जर तुम्ही देखील सूज येण्याच्या समस्येशी लढत असाल त्यासाठी घरीच असलेल्या काही नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने सूज कमी होऊ शकते. यापैकी एक म्हणजे भाज्या होत. काही भाज्यांचे सेवन केल्याने शरीरावर आलेली सूज कमी होऊ शकते. भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात आणि हे अँटी-ऑक्सिडंट्स सूज कमी करण्यास मदत करतात. भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स व्यतिरिक्त, अनेक जीवनसत्त्वे आणि इतर पौष्टिक घटक देखील असतात जे शरीराचे पोषण करतात. तज्ज्ञांच्या मते, पुढील भाज्यांचे सेवन केल्यास अंगावरील सूज कमी होण्यास मदत होते.
लाल आणि हिरवी मिरची
जर तुम्ही दररोज भाज्यांसोबत मिरचीचे सेवन करत असाल तर ती एक चांगली सवय आहे. कारण मिरच्या खाल्ल्याने अंगावरील सूज कमी होण्यासोबतच इतर अनेक फायदे मिळू शकतात. त्यांच्यामध्ये दाह-विरोधी गुणधर्म तसेच कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.
हिरव्या पालेभाज्या
सूज कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करू शकता. त्यात बीटा कॅरोटीन असते. तसेच, या भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे या भाज्या खाल्ल्यास अंगावरील सूज कमी होण्यास मदत होते.
ब्रोकोली
ब्रोकोलीसारख्या भाज्यांमध्ये सल्फोराफेन नावाचे तत्व असते, जे सूज कमी करण्यास आणि रोगांशी लढण्यास मदत करते. सल्फोराफेन हा घटक कॅन्सरशी लढा देण्यातही फायदेशीर आहे.
कांदे
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे वनस्पती रंगद्रव्य असते. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील अनेक दाहक एन्झाइम्स आणि रेणूंची संख्या कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. नियमितपणे कांद्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या रोगांचा धोका कमी होतो.
सिमला मिरची
सिमला मिरचीमध्ये ल्युटेलिन नावाचे तत्व असते त्यामुळे अंगावरील सूज कमी करण्यात ही भाजी महत्त्वाची भूमिका बजावते.
निरोगी शरीरासाठी ताज्या भाज्या व फळे यांचा आहारात समावेश करायलाच हवा. हिरव्या पालेभाज्या, सिझनल फळे, कडधान्ये यांचे नियमित सेवन केल्याने बऱ्याच रोगांचा धोका कमी होतो.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक