Family

योग्य वेळी मुलं होऊ देण्याचा निर्णय चांगला, नवं विवाहितांनी नक्की वाचा

Leenal Gawade  |  Jul 23, 2021
योग्य वेळी मुलं होऊ देण्याचा निर्णय चांगला, नवं विवाहितांनी नक्की वाचा

लग्न झाल्यानंतर काही दिवस तर आनंदी आणि सुखी संसार करावा अशी स्वप्न प्रत्येक जोडप्याची असतात. लगेचच आलेल्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी कोणाचीही नसते. त्यातच लग्न उशीरा झाले तर रोमान्सचा हा कालावधी कमी होऊन जातो.  पण उशीरा लग्न झालेल्या खूप जणांमध्ये मॅच्युरिटी नावाचा प्रकार मुळीच पाहायला मिळत नाही. अशी जोडपी वास्तवापासून कोसो दूर असतात. आजुबाजूला घडत असलेल्य गोड गुलाबी वातावरणामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या घेणे त्यांना नको होते. अशामुळे खूप जोडप्यांना मुलांसाठी खूप उशीरा प्रयत्न करत राहावे लागतात. यामध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यामुळे वाट्याला येते नैराश्य. नैराश्याच्या गर्तेत जाणारी अनेक जोडपी तुम्ही आजुबाजूला पाहिली असतील. अचानक टवटवीत असणारे असे जोडपे अकाली वृद्ध होते त्यांचा स्वभाव बदलू लागतो. अशावेळी योग्य वेळी मुलं होऊ देण्याचा निर्णय घेणे फारच महत्वाचे असते. जर तुम्हालाही ही अडचण येत असेल तर तुम्ही नेमका कसा विचार करायला हवा हे जाणून घेऊया

मनाची तयारी

सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये असते ती म्हणजे मनाची तयारी. खूप जोडपी आपल्या गोड गुलाबी दिवसांमध्ये आपल्या वयाची जाणीव विसरतात. अरे आताच लग्न झाले आताच कुठे बाळ होऊ द्यायचे. बाळ आले की, जबाबदारी येईल मग काहीही करता येणार नाही या विचारामुळे खूप जण मुलं होण्याचे  पुढे पुढे ढकलत राहतात. वयाची तिशी उलटल्यानंतर तुम्ही लग्न करत असाल तर तुम्ही हा विचार आताच बदलून टाका. कारण याच गोष्टीमुळे तुमच्या मनाची तयारी होत नाही. योग्य वेळी घेतलेला निर्णय हा नेहमीच चांगला असतो. 

भावनांना आवर घाला

प्रेम हा आयुष्याचा भाग आहे. जोडप्यामध्ये शारीरिक संबंधही तितकेच महत्वाचे आहे. पण वयपरत्वे काही गोष्टींना नक्कीच काही बाबतीत कमी करणे गरजेचे असते. मुलं झाल्यानंतर आयुष्य बदलते यात दुमत नाहीत. पण जर तुम्हाला पुढे जाऊन कुटुंब वाढवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या भावनांना आवर घालणे गरजेचेच असते.  त्यामुळे तुमच्या रोमँटीक भावनांना आवर घाला आणि कुटुंब नियोजनाचा विचार करत असाल तर तो फार मनापासून आणि  भविष्याचा विचार करुन करा. 

समुपदेशन करुन घ्या

मुलांच्या बाबतीत कधीकधी जोडप्यातील  दोघांपैकी एकाला मुलं होण्याची जबाबदारी नको असते. असावेळी ज्याला बाळ हवं त्याला आपला मुद्दा जोडीदाराला पटवून देता येत नाही.  त्यामुळे संवादाचे रुपांतर विसंवादामध्ये होऊ लागते जर  तुम्हाला काही गोष्टी कशा पटवून द्यायच्या ते कळत नसेल तर तुम्ही योग्य ते  समुपदेशन करुन घ्या.  त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करावे असे कळत नसेल तर तुम्ही आताच योग्य सल्ला घ्या. म्हणजे तुम्हाला योग्यवेळी योग्य निर्णय घेता येईल. 

आता तुम्हालाही बाळ हवं असेल तर त्याचा निर्णय योग्य वेळी घ्या म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन खूप ताण येणार नाही.

अधिक वाचा

Read More From Family