मराठी टेलीव्हिजन वाहिन्यांवर मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजनाची मेजवानी सुरूच असते. मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी असे विनोदी शो प्रेक्षकांना हवेहवेसे वाटतात. वाहिन्यांच्या मांदियाळीत झी मराठीने नेहमीच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील गोष्टी, कथा, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवत जगभरातील मराठी मनावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आता झी मराठी विनोदाची हाईट म्हणजे हे तर काहीच नाही! म्हणत पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या या नव्या कॉमेडी शो बद्दल…
काय आहे हा नवा शो
महाराष्ट्राला विनोदीची खूप मोठी पंरपरा आहे अगदी संत एकनाथ महाराजांच्या भारूडापासून ते बुरगुंडा पर्यंत, किंवा प्र. के अत्रे, पु ल. देशपांडे ते वऱ्हाडकार डॉ. लक्ष्मण देशपांडे पर्यंत विनोद शैलीतून अनेक प्रहसने सादर करण्यात येतात. बऱ्याचदा विनोदामधून कलाकार आयुष्यात पाहिलेल्या अशा एकपात्री व्यक्तिरेखा साकारत असतात ज्या त्यांनी चौकात, नाक्यावर, कट्यावर, चहाच्या टपरीवर, मित्रांसोबत, समारंभात पाहिलेल्या असतात. अशाच काही सेलेब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ज्या सामान्य लोकांना माहिती नाहीत अश्या गोष्टींच्या किस्स्यांचा फड झी मराठी वर रंगणार आहे. अगदी शाहरुखपासून शरद केळकर पर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वे पर्यंत.. त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते लग्नापर्यंत .. या शोचे काही प्रोमोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
उर्फी जावेदच्या फॅशनचा नेटकऱ्यांना येऊ लागलाय वीट
काय काय असणार या शो मध्ये
लवकरच अतरंगी किस्स्यांची मैफिल रंगणार आहे झी मराठी वर ज्यामध्ये विशेष अतिथी म्हणून असणार आहे सर्वांचा आवडता कलाकार सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंड. विशेष म्हणजे या शोचं सूत्रसंचालन करणार आहे तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई अर्थात अक्षया देवधर. अक्षया प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोबतच अनेक सरप्राइझेस ह्या शो च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील. त्यामुळे या मराठमोळ्या विनोदी शोची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागली आहे. “हे तर काहीच नाय!” शो 10 डिसेंबर पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वा. प्रदर्शित केला जाणार आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade