Mental Health

रडण्याचेही होतात आपल्याला अनेक फायदे, जाणून घ्या 

Vaidehi Raje  |  Aug 4, 2022
Benefits Of Crying

आपल्याकडे एक म्हण आहे-  ‘हसा आणि लठ्ठ व्हा’! म्हणजे हसण्याने आपले आरोग्य चांगले राहते.जसे हसण्याचे आरोग्यासाठी फायदे आहेत, त्याचप्रमाणे रडण्याचेही अनेक फायदे आहेत. थोडेसे रडल्याने हृदय हलके होतेच पण आरोग्यालाही फायदा होतो. आपण दुःख व्यक्त करण्यासाठी रडतो. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटते किंवा  कुणी आपल्याला वाईट वागणूक देते तेव्हा दुःखाने , उद्वेगाने आपल्याला रडू येते. पुरुषांनी रडू नये, असे आपल्याकडे सारखे बिंबवले जाते. रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष दोघांनीही रडले पाहिजे, असे संशोधकांचे मत आहे. रडल्यावर मन हलकं झालं असे आपल्याला अनेकदा जाणवते.रडणे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीसाठी फायदेशीर आहे. संशोधकांना त्यांच्या अभ्यासात अश्रूंचे फायदे देखील आढळले, ज्यामध्ये असे दिसून आले की बहुतेक लोकांचे मन रडल्यानंतर हलके आणि ताजेतवाने होते. प्राचीन ग्रीस आणि रोमच्या विचारवंत आणि वैद्यांचाही असा विश्वास होता की अश्रू एक रेचक म्हणून काम करतात, ते आंतर्बाह्य शुद्धता करतात. आजचे मानसशास्त्रही हेच मान्य करते.

सर्व अश्रू सारखे नसतात

Benefits Of Crying

भावनिक उत्तेजनांमुळे येणारे अश्रू, जीवाणूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी येणारे अश्रू आणि डोळ्यात प्रवेश करणाऱ्या बाहेरील वस्तूंवरची प्रतिक्रिया म्हणून आलेले अश्रू असे अश्रूंचे सामान्यतः तीन प्रकार असतात. शास्त्रज्ञांनी अश्रूंना असे तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. ते म्हणजे रिफ्लेक्स टीयर्स, कंटीन्यूअस टीयर्स आणि इमोशनल टीयर्स! रिफ्लेक्स टीयर्स आणि कंटीन्यूअस टीयर्स आपल्या डोळ्यांतील धूर आणि धूळ यांसारखी घाण काढून टाकण्यास मदत करण्यासाठी आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. 

रडण्याचे हे फायदे आहेत 

Benefits Of Crying

रडल्यानंतर चांगली झोप येते. पण जर आपण जास्त रडलो किंवा तासनतास रडत राहिलो तर ते मानसिक विकार, चिंता, नैराश्याचे लक्षण असू शकते याची काळजी घेतली पाहिजे.त्यामुळे जास्त वेळ रडू नये. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Mental Health