उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहिली पासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय करत असतो. उष्माघात टाळायचा असेल तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सतत पाणी पिण्याने तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मुबलक प्रमाणात पाणी पिणं हा देखील शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पाण्यामुळे तुमच्या किडनीचे कार्य सुरळीत चालते. भरपूर प्रमाणात पाणी पिण्याने तुमचं रक्त आणि युरीन शुद्ध होते. म्हणूनच पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. जर तुम्हाला सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर एखादे सरबत घेण्यास काहीच हरकत नाही. उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी ,कोकम सरबत जरूर घ्या ज्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश वाटू शकेल. उन्हाळ्यात चहा अथवा कॉफी पिण्यापेक्षा लिंबूपाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे होऊ शकतात.
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लिंबू हे असतेच. लिंबू एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबामधील सी- व्हिटॅमिन्समुळे अनेक रोगांचे निवारण होते. लिंबू फक्त आरोग्यासाठीच नाहीतर सौदर्य उपचारांवर देखील गुणकारी आहे. लिंबामधील अॅंटी बॅक्टेरिअल आणि अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अगदी प्राचीन काळापासून लिंबाचा वापर औषधाप्रमाणे करण्यात येत आहे. थकवा अथवा कंटाळा आल्यास लिंबूरस घेतल्याने तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं. केस आणि त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकवेळा लिंबाचा वापर केला जातो. स्वयंपाकात लिंबूरस टाकल्याने अनेक पदार्थ रूचकर होतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते त्यामुळे सौदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भुक कमी लागते. सहाजिकच त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मात्र उन्हाळ्यात अनेक ठिकाणी उघड्यावर लिंबूपाणी विकले जाते. जर तुम्हाला सुदृढ आणि फिट राहायचे असेल तर असे बाहेरील उघड्यावरचे लिंबूपाणी अथवा इतर सरबत पिणे टाळा. घरीच लिंबाचा रस काढून लिंबू पाणी करून प्या. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील.
लिंबूपाण्याचे फायदे
- लिंबू पाण्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
- सकाळी उठल्यावर लिंबूपाणी पिण्याने तुमचे पोट स्वच्छ होते.
- लिंबू पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते.
- लिंबू पाण्यामुळे अंगदुखीचा त्रास कमी होतो.
- लिंबू पाण्यामुळे तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या कमी होते.
- लिंबू पाण्यामुळे उन्हाळ्यात इंस्टंट एनर्जी मिळते.
- लिंबू पाण्यातील अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे तुमची त्वचा नितळ दिसते.
- लिंबू पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- वजन कमी करण्यासाठी नियमित कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी प्या. मात्र यामध्ये साखर मुळीच टाकू नका.
- उन्हाळ्यात भुक कमी लागत असेल तर लिंबू पाणी प्या. कारण यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि तुम्हाला भुक लागेल.
- लिंबूपाण्यामुळे त्वचेतील आर्दता टिकून राहण्यास मदत होते.
Beauty and Health Benefits of Lemon : बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे
वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक