Fitness

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या ‘लिंबूपाणी’

Trupti Paradkar  |  Apr 7, 2019
lemon and sugar

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहिली पासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी उपाय करत असतो.  उष्माघात टाळायचा असेल तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सतत पाणी पिण्याने तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. मुबलक प्रमाणात पाणी पिणं हा देखील शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पाण्यामुळे तुमच्या किडनीचे कार्य सुरळीत चालते. भरपूर प्रमाणात पाणी पिण्याने तुमचं रक्त आणि युरीन शुद्ध होते. म्हणूनच पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. जर तुम्हाला सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर एखादे सरबत घेण्यास काहीच हरकत नाही. उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी ,कोकम सरबत जरूर घ्या ज्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश वाटू शकेल. उन्हाळ्यात चहा अथवा कॉफी पिण्यापेक्षा लिंबूपाणी पिण्याचे अनेक चांगले  फायदे होऊ शकतात.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लिंबू हे असतेच. लिंबू एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबामधील सी- व्हिटॅमिन्समुळे अनेक रोगांचे निवारण होते. लिंबू फक्त आरोग्यासाठीच नाहीतर सौदर्य उपचारांवर देखील गुणकारी आहे. लिंबामधील अॅंटी बॅक्टेरिअल आणि अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अगदी प्राचीन काळापासून लिंबाचा वापर औषधाप्रमाणे करण्यात येत आहे. थकवा अथवा कंटाळा आल्यास लिंबूरस घेतल्याने तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं. केस आणि त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी अनेकवेळा लिंबाचा वापर केला जातो. स्वयंपाकात लिंबूरस टाकल्याने अनेक पदार्थ रूचकर होतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते त्यामुळे सौदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भुक कमी लागते. सहाजिकच त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र उन्हाळ्यात  फ्रेश राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मात्र उन्हाळ्यात अनेक ठिकाणी उघड्यावर लिंबूपाणी विकले जाते. जर तुम्हाला सुदृढ आणि फिट राहायचे असेल तर असे बाहेरील उघड्यावरचे लिंबूपाणी अथवा इतर सरबत पिणे टाळा. घरीच लिंबाचा रस काढून लिंबू पाणी करून प्या. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील.

लिंबूपाण्याचे फायदे

Beauty and Health Benefits of Lemon : बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे

पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का (Benefits Of Drinking Water In Marathi)

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Fitness