आरोग्य

निरोगी त्वचा ते बळकट हाडे, द्राक्षे खाण्याचे हे फायदे जाणून घ्या

Vaidehi Raje  |  Mar 22, 2022
grapes

लोक गेली हजारो वर्षे द्राक्षांची लागवड करत आले आहेत आणि आहारात द्राक्षांचा समावेश करत आले आहेत., अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये वाइन बनवण्यासाठी द्राक्षांचा वापर केला जात असे. द्राक्ष खाण्याचे भरपूर फायदे आहेत कारण द्राक्षांमध्ये  भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटिऑक्सिडन्ट्स असतात. द्राक्षांच्या सालीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. फायटोन्यूट्रिएंट्स म्हणजे अशी वनस्पती रसायने ज्यामध्ये रोग-प्रतिबंधक संयुगे असतात. तसेच द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल्स असते जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत. हे अँटिऑक्सिडंट्स विविध प्रकारचे कर्करोग, अल्झायमर आणि हृदयरोगाशी लढतात. आणि शरीराचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच द्राक्षांचे इतरही अनेक फायदे आहेत. 

द्राक्षे खाण्याचे फायदे

द्राक्षे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतात. त्यात पाण्याचेही प्रमाण भरपूर असते जे तुम्हाला उन्हाळ्यात हायड्रेटेड ठेवण्यात मदत करू शकतात. द्राक्षे खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला कसा फायदा होतो ते जाणून घ्या. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात  

द्राक्षे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत असल्याने, ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला यीस्ट इन्फेक्शन सारख्या जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत करू शकतात. आपल्याकडे मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असल्यास, आपले शरीर कोणत्याही अचानक, अल्पकालीन आजाराशी लढण्यास आणि टाळण्यास अधिक सक्षम असते. तसेच द्राक्षे हे तांबे आणि व्हिटॅमिन केचे समृद्ध स्रोत आहेत. तांबे हे ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक खनिज आहे, तर व्हिटॅमिन के रक्त गोठण्यासाठी आणि निरोगी हाडांसाठी आवश्यक आहे. द्राक्षे खाल्ल्यास शरीराला थायमिन, रिबोफ्लेविन आणि बी 6 सारखी जीवनसत्त्वे देखील भरपूर प्रमाणात मिळतात. थायमिन आणि रिबोफ्लेविन हे शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहेत. तर B6 प्रामुख्याने प्रथिनांच्या चयापचय क्रियेसाठी आवश्यक आहे. आपली प्रतिकार शक्ती कमी आहे ही लक्षणे आपले शरीर दाखवते. त्याकडे लक्ष द्या.

कर्करोगास प्रतिबंध करतात

अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेली द्राक्षे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करू शकतात, फ्री रॅडिकल्समुळे आपल्या पेशींचे नुकसान होते आणि विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल नावाचे अँटिऑक्सिडंट देखील आहे जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखून कर्करोगापासून संरक्षण करू शकते. द्राक्षांमध्ये catechins, quercetin व anthocyanins हे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जी कर्करोगाविरूद्ध लढण्यास शरीराची मदत करतात. 

रक्तदाब कमी होतो

द्राक्षांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी असते. तुम्हाला डॉक्टरांनी सोडियम कमी करण्यास सांगितले असेल तर मधल्या वेळात भूक लागली म्हणून तुम्ही इतर कुठला पदार्थ खाण्याऐवजी जर वाटीभर द्राक्षे खाल्लीत तर रक्तदाब कमी होण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण देखील जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते. शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

मधुमेहापासून संरक्षण करतात

द्राक्षांचा ग्लायसेमिक इंडेक्स नंबर कमी असतो, याचा अर्थ ते गोड असले तरी तुमच्या रक्तातील साखर वाढवत नाहीत. द्राक्षांमधील पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात आणि इंसुलिनची संवेदनशीलता वाढवू शकतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला ग्लुकोज वापरण्यास मदत होऊ शकते.

मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत होते 

द्राक्षांमध्ये असलेले resveratrol शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते, ज्याचा तुमच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हाडांचे आरोग्य सुधारते

द्राक्षांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांमुळे द्राक्षे खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होऊ शकते. 

द्राक्षे खाण्याचे हे सगळे फायदे आहेत. म्हणून जेव्हा द्राक्षांचा सिझन असतो तेव्हा रोज वाटीभर द्राक्षे खाल्ली पाहिजेत.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य