Fitness

आहारात असेल सोयाबीन चंक्स तर होईल फायदाच फायदा

Leenal Gawade  |  Sep 1, 2020
आहारात असेल सोयाबीन चंक्स  तर होईल फायदाच फायदा

शाकाहारी लोकांसाठी मासांहाराचा आनंद म्हणजे ‘सोयाबीन चंक्स’ सोयाबीनच्या बियांपासून तेल काढल्यानंतर उरलेला चोथा अर्थात सोयाबीन चंक्स हा देखील आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. एखाद्या खाद्यपदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळवून देण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीन चंक्सचा वापर करायला हवा. जाणून घेऊया सोयाबीन चंक्सचे फायदे आणि ते खाण्यासाठी योग्य रेसिपी

जाणून घ्या, सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

सोयाबीन खाण्याचे फायदे

Instagram

उंची वाढण्यासाठी आहारात समावेश करा या खाद्यपदार्थांचा

असे करा सोयाबीनचे सेवन

Instagram

सोयाबीनचे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करता येते. सोयाबीनची भाजी, भजी किंवा भात असा कशातही त्याचा वापर करता येतो. 

  1. सोयाबीनची भाजी ही पोळी आणि भात दोघांसोबतही खाता येते. ही भाजी कांदा, टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये करता येते. ही भाजी चवीला छान लागते. ही भाजी कोरडी केली तरी चांगली लागते.  इतर कोणत्याही भाजीत बटाटा घालण्याऐवजी जर तुम्ही सोयाबीन घातले तर ते देखील चांगले लागू शकतात.
  2. खूप जणांना ही भाजी खायला आवडत नाही. त्यामुळे अनेकजण त्याची भजी किंवा कबाब करुन खातात. जर तुम्हाला कबाब आवडत असतील. तर तुम्ही एका मिक्सीमध्ये उकडलेले सोयाबीन चंक्स, कच्चा कांदा, मीठ, आवडीचे मसाले घालून कोरडेच वाटून घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन किंवा तांदूळाचे पीठ घालून एकत्र करुन त्याचे कबाब तळून घ्या. तेही चवीला छान लागतात.
  3.  सोयाबीनचा भात तुम्ही कधी खाल्ला आहे का? तोही चवीला छान लागतो. अगदी बिर्याणी किंवा पुलाव करताना तुम्ही त्यामध्ये सोयाबीन चंक्स घाला तुमच्या भाताला नक्कीच एक वेगळी चव येते. 

आता आहारात सोयाबीनचा नक्कीच वापर करा आणि मिळवा फायदेच फायदे

गरम पदार्थ खाताना तोंड भाजलं तर करा हे घरगुती उपचार

Read More From Fitness