Fitness

मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Trupti Paradkar  |  Apr 17, 2019
मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

उन्हाची काहिली सध्या वाढतच चालली आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अनेकजण फ्रिजचे थंडगार पाणी पितात. मात्र फ्रिजमधील थंड पाणी आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते. फ्रिजमधील थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. शिवाय अनेक ठिकाणी उन्हाळ्यात लोडशेडींग केली जाते. त्यामुळे वीजे अभावी फ्रिजचा वापर करणं शक्य होत नाही. पूर्वीपासून पाणी थंड करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. मातीच्या भांड्यात नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड होते. मातीच्या भांड्यातील पाण्याला एक विशिष्ठ प्रकारची चव आणि गंध असतो. शिवाय मातीच्या भांड्यातील थंड पाण्याचे शरीरावर दुष्परिणामदेखील होत नाहीत. कारण मातीचे भांडे हे अनेक मिनरल्स आणि पोषकतत्वांचा खजिनाच असते. मातीच्या भांड्यातील पाण्यात हे गुणधर्म असतात. ज्यामुळे माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम असू शकते. छोटे- मोठे माठ, सुरई, रांजण, मडकी, मातीच्या बाटल्या, मातीचे जग अशी अनेक भांडी पाणी आजही बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील मातीचे भांडे घेऊ शकता. मातीच्या भांड्याला एखादे सुती कापड गुंडाळून ठेवल्यास पाणी लवकर गार होते. शिवाय मातीच्या भांड्यात वाळा घालून ठेवल्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगले फायदे होतात. वास्तविक मातीच्या भांड्यात पाणी साठवणे, अन्नाचा साठा करणे, स्वयंपाक करणे ही आपली परंपराच आहे. मात्र सोयीनुसार या इतर प्रकारच्या भांड्यांचा वापर सुरू झाला. आजकाल मातीच्या भांड्याचे महत्त्व पटू लागल्याने मातीच्या भांड्याचा वापर पुन्हा केला जाऊ लागला आहे. मातीच्या भांड्यात दही लावल्यास ते चांगले लागते. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाला एक छान सुंगध असतो. उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी मातीच्या भांड्यातून पाणी ठेवावे.

मातीच्या भांड्यात पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड कसे होते-

मातीच्या भांड्याला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. या छिद्रांतून भांड्यातील पाणी पाझरते. पाझरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते ज्यामुळे मातीचे भाडे आणि पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड होते. माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्यसमस्या होत नाहीत. 

पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का (Benefits Of Drinking Water In Marathi)

मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे  आरोग्यावर होणारे सुपरिणाम-

फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने होणारे साईड ईफेक्ट्स – Side Effects of Drinking Cold Water in Marathi

जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From Fitness