आरोग्य

स्वयंपाक करताना अशा शिजवा भाज्या, राहाल नेहमी निरोगी

Trupti Paradkar  |  Oct 8, 2021
Healthiest Way To Cook Vegetables in Marathi

भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक प्रकारच्या भाज्या आहेत. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी अगदी रानभाजीपासून ग्रीन हाऊस भाज्यापर्यंत सर्वच भाज्या आपल्या आहारात असायला हव्या. मात्र प्रत्येक भाजी करण्याची एक निराळी पद्धत असते. बऱ्याचदा स्वाद बदलण्यासाठी एकच भाजी आपण निरनिराळ्या पद्धतीने शिजवतो. भाज्यांना चव येण्यासाठी त्यामध्ये नाना प्रकारचे मसाले टाकतो. पण जर तु्म्हाला कुकिंग टेक्निक माहीत नसेल तर ही सर्व मेहनत व्यर्थ आहे. कारण जास्त शिजवल्यामुळे अनेक भाज्यांमधील पोषकमुल्ये नष्ट होतात. यासाठी कोणती भाजी कितीवेळ शिजवावी हे आपल्याला माहीत असायलाच हवं.

जाणून घ्या कोणत्या भाज्या कशा आणि कितीवेळ शिजवाव्या

स्वयंपाक करताना आपण निरनिराळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या, कडधान्य वापरून भाजी बनवत असतो. मात्र यातील कोणत्या भाज्या किती शिजवाव्या हे तुम्हाला माहीत आहे का

भोपळा –

भोपळा आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो आणि आरोग्यासाठी भोपळ्याचे उत्तम फायदे आहेत. लाल पोपळा, कोहळा, दुधी भोपळा असे भोपळ्याचे अनेक प्रकार असतात. पण मात्र भाजीसाठी तुम्ही भोपळा सोलत असाल तर त्याचा काहिच फायदा नाही. कारण लाल भोपळ्याच्या सालींमध्ये बीटा कॅरोटीन असते. ज्यामुळे त्याला लाल रंग मिळतो. जर तुम्ही भोपळ्याची भाजी करताना तो सोलला तर त्यातील पोषक मुल्ये नष्ट होतात. शिवाय भोपळा जास्त शिजवू नये कारण तो  नुसत्या वाफेवरही छान शिजतो. 

अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)

कारले –

वजन कमी करण्यासाठी अनेक जण कारल्याचा ज्यूस पितात. कारल्याची भाजी कडू असली तरी मधुमेही आणि आजारी माणसांसाठी ती वरदान ठरते. मात्र यासाठी जर कारल्याची भाजी करणार असाल तर ती उकडून घेऊ नका. कारण त्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो पण भाजीतील पोषकमुल्ये नष्ट होतात. त्यापेक्षा कारल्याची भाजी परतून करणे एक उत्तम प्रकार आहे. मात्र परताना ती जास्त करपली जाणार नाहीत याची काळजी घ्या.

पालेभाज्या –

कोणतीही पालेभाजी चिरून मग धुवू नये तर आधी धुवून घ्यावी आणि मग बारीक चिरावी. शिवा पालकसारखी भाजी उकडून घेताना त्यातील पाणी फेकून देऊ नये. त्या पाण्याचा वापर सूपसाठी करावा. पालेभाज्या जास्त शिजवल्यामुळे त्यातील पोषकतत्व कमी होतात यासाठी त्या तव्यावर परतून शिजवाव्या.

भाज्या आणि फळं झटपट कापण्यासाठी सोप्या किचन टिप्स

सिमला मिरची –

सिमला मिरची कधीच मोठ्या आंचेवर शिजवू नये मंद आंचेवर ती शिजवल्यास ती स्वादिष्ट लागतेच शिवाय चांगली शिजते. मात्र मंद गॅसवर ती बराच काळ शिजवू नये. सिमला मिरची मऊ झाली की गॅस बंद करावा शिवाय ही भाजी पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये. 

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

Read More From आरोग्य