Fitness

लघवी रोखून धरण्याची तुम्हालाही आहे का सवय ? मग एकदा वाचाच

Leenal Gawade  |  Feb 16, 2020
लघवी रोखून धरण्याची तुम्हालाही आहे का सवय ? मग एकदा वाचाच

लघवी झाल्यानंतर अनेकांना वॉशरुमला जाण्याचा कंटाळा असतो. त्यामुळे लघवी होऊनही अनेक जण लघवीला जात आहे. आता जाईन नंतर जाईन म्हणत खूप जण बराच वेळ जात नाही. मग होते असे की, त्यांना लघवीच्या ठिकाणी अनेक त्रास होऊ लागतात. जर तुम्हालाही कारण नसताना लघवी रोखून धरायची सवय असेल तर तुम्हाला त्याचे होणारे दुष्परिणाम माहीत हवे. कारण लघवी रोखून धरल्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. आता जाणून घेऊया लघवी रोखून धरण्याचे तोटे. करुया सुरुवात

पीरियड पँटी म्हणजे काय आणि तिचा वापर (Period Panties And Its Uses In Marathi)

लघवीच्या जागी जळजळ होणे

shutterstock

लघवी खूप वेळ रोखून धरल्यानंतर अगदी सर्वसाधारणपणे तुमच्या लघवीच्या जागी तुम्हाला जळजळ जाणवू लागते. पहिल्यांदा ही जळजळ फार वाटत नाही. पण जर तुम्ही हे सतत करत राहिलात तर ही जळजळ वाढू लागते.  लघवी रोखून धरल्यानंतर जर तुम्ही लघवीला गेलात तर तुम्हाला पटकन लघवीला होत नाही. अशावेळी थेंब थेंब लघवी होते. लघवी करण्यासाठीही तुम्हाला जोर लावावा लागतो.जर तुम्हाला अशी करायची सवय काही कारणास्तव लागली असेल तर ती आताच सोडा कारण त्याचे दुष्परिणाम होतील.

पोट फुगणे

लघवीच्या जागी जळजळ होण्यासोबतच तुम्ही लघवीला वेळीच न गेल्यामुळे तुमच्या पोटाचा आकार मोठा झाल्यासारखा दिसतो. तुमचे पोट फुगल्यासारखे वाटते. कधी कधी हे पोट इतके फुगते की, तुमचे पोट इतर दिवशीपेक्षा जास्त मोठे वाटू लागते. जर लघवी रोखून धरल्यानंतर तुम्हाला तुमचे पोट असेच फुगल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या जागेवरुन उठण्याची वेळ आली आहे. तुम्ही पटकन उठून वेळीच लघवीला जा नाहीतर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

जाणून घ्या हिवाळ्यात महिलांना युरिन इन्फेक्शनचा का असू शकतो जास्त धोका

ओटी पोटात कळ येणे

shutterstock

लघवी धरुन ठेवल्यामुळे तुमच्या ओटी पोटात कळ येते. ही कळ तुम्हाला रोखता येत नाही. तुमच्या ओटीपोटात अशा प्रकारची कळ येत असेल तर तुम्हाला पुढे जाऊन दुसरेही काही त्रास होऊ शकतात. अनेकदा कामाच्या ठिकाणी आपल्याला लघवी झालेली कळते पण काम सोडून खूर्चीवरुन उठण्याचा त्रास अनेकांना असतो. तुमची रोखून धरण्याची क्षमता संपली की, मग मात्र तुम्हाला पोटात कळा यायला सुरुवात होते. या कळा आल्यानंतर तुम्ही कितीही लघवीला गेलात तरी सुद्धा तुम्हाला लघवीच्या ठिकाणी त्रास होतोच. हा त्रास असह्य होतो. कारण तुमचे पोट तर दुखतेच पण तुम्हाला लघवीच्या जागी इन्फेक्शनसुद्धा होते. 

मुतखड्याचा त्रास

महिलांमध्ये मुतखड्याचा त्रास हा फारसा नसला तरी सुद्धा लघवी रोखून धरण्यामुळे हा त्रास होण्याचीशक्यता महिलांनाही असते. रक्तामधील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे मुतखडा होतो हे आपल्याला माहीत आहे. याशिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुतखड्याचा त्रास होऊ लागतो. मुतखड्यामुळे तुमच्या लघवीच्या ठिकाणी जळजळ होऊ लागते. 

युरिन इन्फेक्शन होणे

shutterstock

महिलांमध्ये युररन इन्फेक्शनचे प्रमाण जास्त असते. लघवी रोखून धरण्याच्या सवयीमुळे तुम्हाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. तुमची लघवी पिवळी होते त्यामध्ये पस होण्याची शक्यता असते. याचा परिणाम तुम्हाला युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. महिलांमध्ये होणाऱ्या या त्रासाला UTI असे म्हणतात. तुम्ही लघवी जास्त रोखून धरली तर तुम्हाला किडणी फेल्युअरचा त्रासही होऊ शकतो. 

आता जर तुम्ही लघवी रोखून धरत  असाल तर तुम्ही हे करणे आताच थांबवा कारण त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी 2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या. ला भेट द्या.

Read More From Fitness