पावसाळ्यात इतकं सुखद वातावरण असतं की, या काळात वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा होते. यामध्ये सगळ्यात पुढे असतील ते म्हणजे चटपटीत आणि चमचमीत पदार्थ. या दिवसात पचनशक्तीही चांगली असते. शिवाय काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. म्हटल्यावर खूप जण या दिवशी वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारतात. खाऊ गल्ल्या तर या दिवसात तुंडुंब भरलेल्या असतात. डोसा, पावभाजी, पाणीपुरी, शोरमा, पावभाजी, वडापाव सगळे काही खावेसे वाटते. पदार्थांची ही नुसती नावं घेऊनही तुमच्या तोंडाला पाणी आले असेल ना? हे सगळं खाण्याच्या नादात कधी कधी आपण इतके खाऊन जातो की, त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी, पोटदुखी आणि जुलाब होतात. ज्याचा त्रास काही केल्या कमी होत नाही. अनेकांना या काळात फुड पॉयजनिंगचा त्रासही होऊ शकतो. अशा काही गोष्टी खाल्ल्यानंतर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही काही सोप्या गोष्टी करायला हव्यात. पावसाळ्यात होणाऱ्या अमिबियासिस या विषयी अधिक माहिती आपण घेतलीच आहे
पावसाळ्यात पचनशक्ती ही कितीही चांगली असली तरी देखील पाण्यातून जरा काही दूषित घटक आले की, त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. या काळात अनेक आजार डोकं वर काढत असतात. अशातच पचनशक्ती चांगली असली तरी प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. अनेकदा ॲसिडिटी होण्याचे त्रासही याच दिवसात होतात. त्याचे पर्यवसान पुढे जाऊन जुलाब होण्याकडे होते. अशावेळी काही सोपे उपाय केले तर तुम्हाला त्यापासून आराम मिळू शकतो.
- ओव्याचे पाणी : ओव्याचे पाणी ( Carrom Seed Water) यामुळे ही पोटाला आराम मिळतो. अनेकदा पोट फुगल्यासारखे होते. पोटफुगी कमी करुन जर पोटाला आराम मिळू द्यायचा असेल तर तुम्ही एका भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये ओवा घाला हे पाणी उकळा. हे पाणी थंड करुन प्यायले तरी चालू शकते. डिसेंट्रीचा त्रास सुरु झाल्यावर तुम्ही दिवसातून तीन-चार वेळा प्या.
- बडिशेपेचे पाणी : पोटाला थंडावा देण्यासाठी बडिशेपेचे पाणी हे देखील चांगले आहे. अगदी ओव्याच्या पाण्याप्रमाणेच तुम्हाला बडिशेप घालून पाणी गरम करायचे आहे. ओव्याचे पाणी कडू लागत असेल तर तुम्ही बडिशेपेचे पाणी पिऊ शकता. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळेल.
- सुका पाव: जर शौचातून नुसते पाणी जात असेल आणि तुम्हाला त्यामुळे खूपच जास्त थकवा आला असेल तर अशावेळी तुमची शौचाला योग्य होणे फारच जास्त गरजेचे असते. अशावेळी बेकरीचा सुका पाव तुम्ही खाल्ला तरी देखील तुम्हाला त्यामुळे आराम मिळू शकतो. त्यामुळे सुका पाव चांगला चाऊन खा. त्यानंतर तुम्हाला शौचाला झाले तरी चालू शकते. पण तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
- दही: पावसात शक्यतो आपण दही खाण्याचा विचार करत नाही. पण जर तुम्हाला पोटदुखी आणि पोटफुगी आणि ॲसिडिटी होत असेल तर अशावेळी वाटीभर दही मऊभातासोबत खाण्यास काहीही हरकत नाही. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळू शकतो
- पाणी पिणे: सतत जुलाब होत असेल तर त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत असते. अशावेळी डिहायड्रेशन होऊन थकवा येतो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. त्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही.
आता असा त्रास सुरु झाला की, तुम्ही लगेचच हे काही सोपे उपाय करा.