त्वचेची काळजी

उन्हामुळे काळवंडले असतील हात-पाय, तर घरीच करा हे सोपे उपाय

Trupti Paradkar  |  May 18, 2022
home remedies to remove tan from hand and legs

उन्हाळा ऋतू घामाच्या धारा आणि उकाड्यामुळे असह्य होतो. शिवाय जर तुम्ही भर उन्हात घराबाहेर पडला तर काही वेळातच तुमची त्वचा काळवंडते. उन्हाळ्यात तुम्ही चेहरा आणि इतर अवयव सनस्क्रीन अथवा कपड्याने झाकता. मात्र बऱ्याचदा पावलं आणि तळहात मात्र उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे चांगलेच टॅन होतात. हातापायाचा झाकलेला भाग आणि उघडा पडलेला भाग असे दोन रंग शरीरावर दिसू लागतात. पाय फूटवेअर जितके झाकले जातील तितके नीट राहतात मात्र बाकीचा भाग चांगलाच काळवंडतो. अशा मुळे तुमच्या सौंदर्यात नक्कीच बाधा येऊ शकते. यासाठीच हातापायाचे टॅनिंग काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता.  यासोबतच तुम्हाला tanning oil वापरण्याचे फायदे माहीत आहेत का?(Best Tanning Oils In Marathi)

हातापायाचे टॅनिंग काढण्यासाठी घरगुती उपाय

हातापायावर पडलेले काळे चट्टे उन्हामुळे पडले असले तरी घरीच काही उपाय करून तुम्ही ते कमी करू शकता.

home remedies to remove tan from hand and legs 

मुलतानी माती

प्रत्येकाच्या घरी मुलतानी माती असतेच. जर तुमच्या हातापायावर उन्हामुळे चट्टे पडले असतील तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर करून ते कमी करू शकता. यासाठी दोन चमचे मुलतानी मातीत एक चमचा चंदना पावडर आणि एक चमचा गुलाबपाणी मिसळून छान पेस्ट तयार करा. गुलाबपाण्याऐवजी तुम्ही कच्चं दूध देखील यासाठी वापरू शकता. हातापायावर हा पॅक लावा आणि दहा मिनीटांनी साध्या पाण्याने हात पाय धुवा.

केळ्याचा गर

केळं जितकं शरीरासाठी पोषक आहे तितकंच ते तुमच्या त्वचेसाठीदेखील उत्तम आहे. यासाठी एक खूप पिकलेलं केळं चांगलं स्मॅश करा आणि त्यामध्ये मध अथवा लिंबू मिसळा. याचं मिश्रण एकजीव करून तुमच्या हातापायावर चोळा. ज्यामुळे तुमच्या हात आणि पायाचा काळेपणा कमी होईल.

बेसन

बेसनाचा वापर आपण स्वयंपाकासाठी करतोच. ज्यामुळे प्रत्येकाच्या घरात बेसन असतंच. दोन ते तीन चमचे बेसनामध्ये दही आणि मध एक चमचा मिसळा. सर्व मिश्रण एकजीव करा आणि हातापायावर चोळा. वीस मिनीटांनी हात आणि पाय पाण्याने धुवून टाका. तुमच्या हातापायावर एक छान चमक येईल. सोबत वाचा उटणे लावण्याचे फायदे, कसे तयार कराल घरच्या घरी (Benefits Of Ubtan In Marathi)

कोरफडीचा गर

कोरफडीमुळे त्वचेवरील टॅनिंग जाण्यास चांगली मदत होते. यासाठी कोरफडीचा ताजा गर काढून घ्या आणि तुमच्या हातापायावर लावा. वीस मिनीटांनी पॅक सुकला की हात पाय पाण्याने स्वच्छ करा. नैसर्गिक उपायांनी करा तुमच्या त्वचेला डीटॅन, जाणून घ्या घरगुती उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From त्वचेची काळजी