सुट्टी असली की आपण मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर आउटिंगचे, गेटटुगेदरचे प्लॅनिंग करू लागतो. आता कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांची बाहेर जाण्याची सवय मोडली आणि लोक घरीच गेट टुगेदर करू लागले. आता चार लोक एकत्र येणार म्हटल्यावर चमचमीत खाणे पिणे होणार हे तर ओघाने आलेच. गप्पा मारता मारता स्नॅक्स कधी संपतात हे कळतही नाही. आपण जेव्हा मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना घरी आमंत्रित करतो त्यांच्यासाठी काहीतरी टेस्टी चमचमीत पदार्थ करतो. जेवणाच्या पदार्थांचे तर आपल्याकडे बरेच पर्याय असतात. पण फक्त चहा-कॉफी सरबतापुरते एकत्र जमायचे असेल अशा परिस्थितीत कधी कधी त्यासोबत काय सर्व्ह करावे असा आपल्याला प्रश्न पडतो. साहजिकच, साधे चिप्स, पापड किंवा बिस्किटे सर्व्ह करणे चांगले दिसत नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही या साध्या गोष्टींना स्पेशल बनवू शकता. साधे पापड, चिप्स, नॅचोज, फ्रेंच फ्राईज यांच्याबरोबर जर टेस्टी डिप सर्व्ह केले तर ती एकदम स्पेशल डिश बनू शकते. तुम्हाला हेल्दी ऑप्शन हवे असेल तर या डीप बरोबर तुम्ही काकडी, गाजर, सेलरी, झुकिनी अशा भाज्यांचे काप देखील सर्व्ह करू शकता. हे डीप बाहेरही मिळते. पण तुम्हाला जर ते घरी बनवायचे असेल तर ते तुम्ही झटपट सोप्या पद्धतीने बनवू शकता.
सॉर क्रीम अनियन डिप
साहित्य – 1 कप हंग कर्ड (ग्रीक योगर्ट), 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम , 1/2 टीस्पून लिंबाचा रस, 2 पातीचे कांदे बारीक चिरून, 2 लसूण पाकळ्या बारीक चिरून, 1/2 टीस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, चवीनुसार मीठ
कृती – सॉर क्रीम अनियन डिप बनवण्यासाठी प्रथम एक लहान पॅन गरम करा आणि त्यात ऑलिव्ह ऑइल घाला. नंतर त्यात पातीचा कांदा घाला आणि एक मिनिट परता. कांद्याची पात घालू नका. नंतर त्यात चिरलेला लसूण घालून आणखी एक मिनिट परतून घ्या. मग त्यात चिमूटभर मीठ घालून कांदे आणि लसूण मंद आचेवर आणखी दोन मिनिटे कांदे मऊ होईपर्यंत शिजवा. कांदे आणि लसूण ब्राऊन करू नका. मग त्यात कांद्याची पात घाला आणि एक मिनिट परतून घ्या. कांद्याची पात मऊ होऊ करू नका. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड करा. मिक्सरच्या भांड्यात हंग कर्ड आणि फ्रेश क्रीम, मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात कांदा आणि लसणाचे मिश्रण घालून एकत्र करून घ्या. तुमचे टेस्टी डिप तयार आहे. पार्टीसाठी टुगेदर साठी तुम्ही स्नॅक्सला चिप्स, वेफर्स बरोबर छोटे छोटे होममेड पिझ्झा देखील सर्व्ह करू शकता.
चीज अनियन डिप
साहित्य -2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 1/2 कप क्रीम चीज ,2 चमचे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ
2 टेबलस्पून अनसॉल्टेड बटर, 1 कप दही, 2 टेबलस्पून ताजी हिरवी कांद्याची पात बारीक चिरून, काळी मिरी पावडर चवीनुसार
कृती – एका भांड्यात क्रीम चीज आणि लिंबाचा रस एकत्र घेऊन फेटा. त्यात मीठ घाला, मिक्स करा आणि बाजूला ठेवा. एका नॉन-स्टिक पॅनमध्ये बटर गरम करा, त्यात कांदे आणि मीठ घाला आणि अधूनमधून ढवळत कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. हे मिश्रण थंड करून घ्या. परतलेले कांदे, दही, क्रीम चीज, लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड हे सर्व एकत्र करा व चांगले ढवळून घ्या. चिप्स, पापड, फ्रेंच फ्राईज, नॅचोज, भाज्या अशा कुठल्याही स्नॅकबरोबर हे टेस्टी डिप सर्व्ह करा.
अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच टेस्टी अनियन डिप बनवू शकता.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक